Sunday , July 26 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या कथाकथन स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे उत्साहात संपन्न झाल्या. 25 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी कथाकारांची निवड करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक गटाच्या कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सहसचिव पी. पी. बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर, सदस्य सुरेश पाटील, शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राथमिक व माध्यमिक गटातून 78 स्पर्धकांनी सहभाग घेतला.. यातून सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली.

1) अथर्व विठ्ठल गुरव विद्यामंदिर तडशिनहाळ
2) आराध्या संतोष शिवणगेकर मराठी विद्यामंदिर शिवणगे
3) मनाली सुभाष बराटे -मराठी विद्यानिकेतन बेळगाव
4) सई यादव -ताराराणी हायस्कूल
5) समृद्धी सांबरेकर -महिला विद्यालय
6) श्रध्दा पाटील -सरकारी मराठी शाळा निलजी

या कथाकथन स्पर्धेचे परीक्षण डॉ. संजीवनी खंडागळे, शैलजा मत्तीकोप, बी. बी. शिंदे, बसवंत शहापूरकर यांनी केले. सर्व निवड झालेले कथाकथनकार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बाल साहित्य संमेलनामध्ये आपल्या कथा सादर करणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी इंद्रजीत मोरे, एन. सी उडकेकर, बी.जी. पाटील, नीला आपटे, धीरज सिंह राजपूत, प्रसाद सावंत, महेश हगिदळे, लता नगरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार गजानन सावंत यांनी व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *