Tuesday , March 3 2026
Breaking News

ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कवयित्री रेखा गद्रे, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, खजिनदार विनिता बाडगी व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी रेखा गद्रे यांनी सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या विडंबनात्मक कविता व गीत सादर केली त्यास उपस्थित सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पांडुरंग कारकल यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी विजय बांदिवडेकर, रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, सदाशिव व गिरिजा कुलकर्णी, विजय वाईगडे, डॉ. श्रेयश चौगुले, नारायण कोरडे, योगिनी देसाई, यांनी मराठी, हिंदी कन्नड गाणी व अभंग सादर केले. सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले. पाहुण्यांची ओळख विनिता बाडगी तर आभार प्रदर्शन संगीता जोशी यांनी केले.

 

About Belgaum Varta

Check Also

आईच्या बाराव्या दिवशी जपली सायनेकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी!

Spread the love  बेळगाव : आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनेकजण परोपकार करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *