

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये महात्मा फुले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 42 शाळेतील 84 स्पर्धकांचा सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे व परीक्षक व मराठी विद्यानिकेतन शाळेचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण समन्वयक सविता पवार यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. स्पर्धेसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य, पेरियार स्वामी: जीवन व कार्य, आधुनिक जगातील डिजिटल आव्हाने, प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आणि कार्य असे विषय होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. सुरेश पाटील, शैलजा मत्तीकोप, बसवंत शहापूरकर, प्रा. प्रसाद वाडेकर, बी. बी. शिंदे, हर्षदा सुंठणकर उपस्थित होते. पहिली फेरी तीन गटात पार पडली व अंतिम फेरीसाठी पंधरा विद्यार्थ्यी निवडण्यात आले..
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -प्रथम क्रमांक – तन्मयी भरमू केसरकर (स्वामी विवेकानंद विद्यालय), द्वितीय क्रमांक- मनाली सुभाष बराटे (मराठी विद्यानिकेतन बेळगाव), तृतीय क्रमांक- संपूर्णा शशिकांत पाटील (वाघवडे हायस्कूल वाघवडे), उत्तेजनार्थ क्रमांक- गौतमी विनोद डिचोलकर (राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी), रुणाली महादेव पाटील (महात्मा गांधी हायस्कूल गौंडवाड), सई सागर यादव (ताराराणी हायस्कूल खानापूर), सृष्टी देसाई (बालिका आदर्श विद्यालय बेळगाव), सारिका प्रकाश पाटील (रणझुंजार हायस्कूल निलजी) यांना देण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख माया पाटील व मुक्ता आलगोंडी यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांना श्वेता सुर्वेकर, प्रीती खुडे, स्नेहा कुप्पेकर यांचे सहकार्य लाभले. तर शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी करण्यात आली.सूत्रसंचालन व आभार माया पाटील यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी ज्योती महाविद्यालय कॅम्प बेळगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेमध्ये करण्यात येईल.
Belgaum Varta Belgaum Varta