

बेळगाव : अलिकडे शेतकऱ्यांचे जगणंच मुश्कील झालंय. एकिकडे निसर्ग साथ देत नाही तर दुसरीकडे शेतातील किमती वस्तूंच्या चोरीने शेतकरी अक्षरशः वैतागला आहे. मागे अज्ञातानी येळ्ळूरच्या शेतकऱ्याची कुपनलिकेची वायर तोडून त्यात दगड टाकून मोठ नुकसान केलं होतं. ती पूर्ववत करायला सुमारे लाखभर खर्च आला. काल रात्री पुन्हा येळ्ळूर शिवारातील श्रीधर कानशिडे, महादेव कुगजी, डोण्यान्नावर, गोरल सह इतर दहा-बारा शेतकऱ्यांच्या बोर्डकडून कुपनलिकेतून जोडलेल्या विद्यूत भार सुरु असलेल्या वायरी कटरने तोडून चोरट्यांनी चोरुन नेल्याचे शेतकऱ्यांचा निदर्शनास आले. त्या भागात कायम दारु, गांजा, जुगारसह इतर नशील्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात युवक शेतात बसून राजरोस वापर करत असतात. त्यामूळे या भागात महिला शेतात येण्यास घाबरतात. आतातर अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कुपनलिकांचे नुकसान झाल्याने गांगरून गेले आहेत. आता आपल्या साहित्याचे रक्षण कसे करावे हाच प्रश्न पडलाय.
सदरी वायरीत तांब्याच्या तारा भरपूर प्रमाणात आहेत आणि त्या एकत्र करुन जाळून त्यातील तांबे विकून चैनी करण्यासाठी सदर कृत केले आहे. रस्त्यालगत किंवा जवळ शेड असलेल्या ठिकाणची चोरी नाही. तर जिथे कोण नसते तिथल्याच वायरी चोरी गेलेत. यामूळे शेतकऱ्यांना आता पुन्हा भुर्दंड पडला आहे. आधीच खरिप पिकं अर्धी त्यात हे नुकसान म्हटल्यावर चिंता लागली आहे. आता रब्बी, तरकारी, खरबूस, काकडी, दोडकी, वांगी, टोमॅटोसह ईतर पीकं घेणारे शेतकरी परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्यावर्षी शेतकऱ्यांची सुमारे 79/80 हजारची फुट्टी चोरीला गेली, तशाच वायरिही चोरीला गेल्या. हे कोणी सराईतच चोर असतील।म्हणजे त्या परिसरातील इत्तंभूत माहिती असलेले. त्यासाठी आता रब्बी हंगामात मुख्य पाणीच हवे. पण आता खर्च करुन जोडून घेतल्यावर पुन्हा अशी चोरी झाली तर काय कराव हाच घोर शेतकऱ्यांना लागलाय.
त्यासाठी संबंधीत पोलिस खात्याने शेतकऱ्यांच्या वस्तूंची अशी चोरी न होण्यासाठी आपल्यापरिने काय उपाय केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याची शहनिशा करुन नुकसान थांबवावे. तसेच शिवारात जूगार, दारु, गांजासह इतर नशिले पदार्थ सेवन करण्यासाठी बसणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी समस्त शेतकरी बंधूची पोलिस खात्याला कळकळीची विनंती आहे.
लवकरच या संबंधी बेळगाव मा. पोलिस आयुक्त तसेच बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात शेतकरी लेखी तक्रार दाखल करणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta