Wednesday , March 4 2026
Breaking News

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावचा १००% निकाल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Spread the love

 

बेळगाव : येथील मराठा मंडळ संस्थेच्या फार्मासी कॉलेजमध्ये अंतिम वर्षातल्या B.Pharmacy या अभ्यासक्रमात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर झाला असून.. विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून कॉलेजचा १००% निकाल लागला आहे.

कु. रोहिणी प्रभाकर पाटील हिने ८६.५४ % गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. सिमरन सुंठणकर हिने ८५.८१% द्वितीय क्रमांक तर
३) कु. मानसी बागेवाडी आणि कु.साक्षी घोरपडे या दोघींनी ८४.५४% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.

तसेच इतर विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश मिळवलं आहे.

कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णु कंग्राळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून हे यश मिळवले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य ही देखील या यशामागची महत्त्वाची कारणं आहेत,” असं प्राचार्यांनी सांगितलं.

या यशामुळे मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

संस्थेच्या *अध्यक्षा डॉ. रजश्री नागराजु* यांनी
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *