Thursday , March 5 2026
Breaking News

डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संविधानाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. चौगुले यांनी संविधानाचे महत्व सांगितले व शाळेचे शिक्षक श्री. एस. एस. गवस व श्रीमती नेत्रा यांनी संविधानाबद्दल आपले विचार व्यक्त केले. तसेच संविधानाबद्दल विद्यार्थ्यांनी आपले सुंदर विचार भाषणातून व्यक्त केले. शाळेच्या विद्यार्थिनींनी सुंदर नृत्यच्या माध्यमातून समानता, स्वातंत्र्य, न्याय यांचे पालन करण्याचा संदेश सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवीला. संविधान संरक्षणासाठी शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून शपथ घेण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *