

बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात चोरी व घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांची रात्रीची गस्त असून देखील बेळगाव शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. काल रात्री शहरातील मध्यवर्ती भागातील पांगुळ गल्ली येथील तीन दुकाने फोडून दुकानातील साहित्य रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. भरवस्तील झालेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील पांगुळ गल्ली येथे बॅग विक्रीच्या दुकानात आणि दोन कपड्यांच्या दुकानात शटर तोडून चोरट्याने साहित्य व रोख रक्कम लंपास केली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. रात्रीच्या अंधारात दुकानचे शटर तोडून चोरट्याने बॅटरीच्या प्रकाशात गल्ल्यातील रोख रक्कम व किमती साहित्य शोधाशोध करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर चोरीचा प्रकार उघडकीस येतात दुकान मालकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली खडे बाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास कार्य हाती घेतले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची खडे बाजार पोलीस तालुका नोंद झाली असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta