

बेळगाव : शहरातील अमली पदार्थ विरोधी मोहीमेअंतर्गत सिटी क्राईम ब्रँच (CCB) पोलिसांनी हेरॉईनची विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 26 नोव्हेंबर 2025 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस उद्यान परिसरात करण्यात आली. अमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहमद्दाहीद अतिकुरुहमान मुल्ला (वय 27), रहिवासी 12 वा क्रॉस उज्वल नगर बेळगाव आहे. उपलब्ध माहितीनुसार आरोपी सार्वजनिक ठिकाणी हेरॉईनची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पीएसआय मंगेश बजंत्री आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून हेरॉईन विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली. कारवाईदरम्यान आरोपीकडून 7.56 ग्राम हिरॉईन (अंदाजे किंमत रुपये 15,800) मोबाईल फोन अशी एकूण 25 हजार आठशे रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपीने हा माल मुंबई येथील संतोष नामक व्यक्तीकडून आणला असल्याची माहिती दिली. याप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. सीसीबी पथकाने केलेल्या कामगिरीचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta