
बेळगाव : बेळगाव येथील एपीएमसी मार्केट परिसरात असलेले नेमदि सेवा केंद्रातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्यामुळे नागरिकांना ग्राहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर नेमदी सेवा केंद्र सकाळी एक -दोन तास खुले राहते त्यानंतर दुपारच्या जेवणाची सबब देत अधिकारी हे सेवा केंद्र बंद करून जातात ते पुन्हा अधिकारी सेवा केंद्रात येण्याची शाश्वती नसते खरे तर सेवा केंद्राचा उद्देश नागरिकाला त्यांच्या मिळकतीचा दाखला, जात प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र अशा विविध कागदपत्रांचा जलद व सुरळीत पुरवठा करणे हा आहे परंतु एपीएमसी परिसरातील या केंद्राच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू असल्यामुळे नागरिकांची कागदपत्रांसाठी ससेहेलपट सुरू आहे. या केंद्रातील अधिकारी मनमानी करीत असल्यामुळे आवश्यक कागदपत्र व प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना विनाकारण प्रतीक्षा करावी लागत आहे. नागरिक कागदपत्रे घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहतात. दुपारनंतर कार्यालय उघडेल याची खात्री देखील नसते त्यामुळे नागरिकांना निष्फळ प्रतीक्षा करावी लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या अनियमित सेवेमुळे विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, नोकर भरती प्रक्रियेत असलेल्या युवकांचे त्याचप्रमाणे तातडीच्या प्रमाणपत्रांची आवश्यकता असलेल्या नागरिकांची कामे खोळंबून जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, एपीएमसी परिसरातील नेमदी केंद्र नियमित व वेळेवर सुरू राहावे, अनियमित उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवेमध्ये पारदर्शकता आणावी. सार्वजनिक सेवांचा हेतू लोकांना सुविधा पुरविण्याचा असताना प्रत्यक्षात येथे सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी उघडपणे दिसून येत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या सेवेला शिस्तबद्ध करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta