
बेळगाव : विविध शरीर सौष्ठव स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या विजेत्या स्पर्धकांचा जिल्हा व राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
क्लब रोड येथील डॉ. संजय अण्णा सुंठकर यांच्या कार्यालयामध्ये बेळगांव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स व कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स च्यावतीने मी. आशिया व मी. वर्ल्ड -2025 या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये बेळगांवचे नाव उज्वल केलेल्या श्री. विनोद पुंडलिक मेत्री, श्री. रोनक किशोर गवस, श्री. चेतन ताशिलदार तसेच राष्ट्रीय कराटे संघटनेमध्ये पद भूषविलेले श्री. जितेंद्र काकतीकर यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाला समाजसेवक श्री. मल्लेश अण्णा चौगुले है प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी संघटनेचे डॉ. संजय अण्णा सुंठकर, राजेश लोहार, रणजित किल्लेकर, अनिल अंबरोळे, नारायण चौगुले, बाबू पावशे, सुनील बोकडे, राजू पाटील, सुनील चौधरी, प्रवीण कणबरकर, प्रसाद जाधव, संतोष सुतार, चनाप्पा, अनेक व्यायाम पटू उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta