
निपाणी (वार्ता) : भोवी-वडर समाज विकास निगममधून समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कोणकोणत्या योजना या विकास निगममधून राबविण्यात येतात. याच्या माहितीसाठी भोवी वडर समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी बेळगावात बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला निपाणी, चिकोडी, अथणी, रायबाग, गोकाक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वड्डर -पवार यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत व कर्नाटक भोवी-वडर विकास निगमचे अध्यक्ष एम. रामप्पा यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक होणार आहे. या बैठकीला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, एस. सी. महादेवाप्पा, शिवराज तंगडगी यांच्यासह विविध जिल्ह्यातून भोवी-वडर समाजाचे जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. वडर समाज आज मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे. असे असताना भोवी वडर निगमच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समाजाला सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta