
मच्छे : गावातील सरकारी मॉडेल प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे शाळा सुधारणा समितीची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली. अध्यक्षपदी गजानन कृष्णा छप्रे तर उपाध्यक्षपदी सौ. मोहिनी अमित बाळेकुंद्री यांची निवड करण्यात आली.
पालक, शिक्षक तसेच स्थानिक सदस्यांचा या समितीत समावेश असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध राहणार असल्याचे नूतन अध्यक्ष श्री. गजानन छप्रे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी डिजिटल शिक्षणाला प्राधान्य, विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन, मराठी शाळांचे अस्तित्व अधिक भक्कम करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शाळेतील मुलांसाठी मूलभूत सुविधा, स्वच्छता, ग्रंथालय समृद्धी, क्रीडा साहित्य उपलब्धता यावरही भर देण्यात येणार असल्याचे सर्वानुमध्ये ठरवण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा नियमित आढावा, पालक-शिक्षक संवाद अधिक दृढ करणे, तसेच दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत योजना राबविण्याचे ठरविण्यात आले.
या निवडीचे मच्छे ग्रामस्थ व बाल शिवाजी वाचानालय यांचेकडून स्वागत केले असून नवीन समितीच्या कार्यातून शाळेतील शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta