
बेळगाव : मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष हिवाळी अधिवेशनात थांबलेला दिसून येत आहे. दरम्यान आज गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या विधान परिषदे उपस्थित होते. यावेळी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना त्यांचे आसन आणि टेबलामध्ये अंतर कमी होते. त्यामुळे सिद्धरामय्या यांना उभे राहून बोलताना अडचणीचे झाले होते.
या खुर्चीवर अवघडल्यासारखे वाटत आहे असे सांगून, त्यांनी आपले आसन मार्शल करवी मागे घेण्यास लावले. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या विधानामुळे य विरोधी सदस्यांमधून मार्मिक टोलेबाजी झालेली पाहायला मिळाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधी सदस्यांना उत्तर देत वेळ मारून नेली. मात्र काही वेळानंतर विरोधी सदस्यांनी ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याची री ओढत विधान परिषदेतील आसन व्यवस्था ठीक नसल्याची नाराजी व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta