
बेळगाव : गर्लगुंजी येथे एकलव्य क्रीडा संघातर्फे 14 वर्षाखालील व 14 वर्षावरील मुलामुलींच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन माध्यमिक विभागाच्या मुलींच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकावत रोख रक्कम 11,111 रुपये बक्षीस व ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत स्नेहा हिरोजीची ऑल-राउंडर खेळाडू व वैष्णवी कोवाडकरची उत्कृष्ट धावपटू म्हणून निवड करण्यात आली. 14 वर्षावरील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात भावेश्वरी क्रीडा क्लब येडोगा ‘अ’ संघावर एकतर्फी विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 14 वर्षाखालील मुलांनी तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सुरपूर क्रीडा संघाचा एक डाव व एक गुणांनी विजय मिळवत रोख रक्कम 2222 रू व ट्रॉफी असे तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. या संघांना प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. या खो -खो संघांना शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, क्रीडा शिक्षक दत्ता पाटील, महेश हगिदळे, वैभवी दळवी, शिक्षकवर्ग यांचे प्रोत्साहन मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta