
बेळगाव : “मुलांवर कोणताही अनावश्यक दबाव न टाकता त्यांच्या आवडीच्या निवडीला पालकांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मात्र, त्याच वेळी पालकांची स्वप्ने पूर्ण करणे हे देखील मुलांचे कर्तव्य आहे,” असे मत महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
सुवर्ण विधानसौध सभागृहात कर्नाटक बालविकास अकादमीच्या पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. “आजची मुले हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांच्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचे राजकारण करणे मान्य नाही,” अधिकार ही लोकांसाठी काम करण्याची एक संधी आहे. एस. एम. कृष्णा यांच्या सरकारच्या काळात सुरू झालेली ‘मध्यान्ह आहार योजना’ संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरली होती. उपासमारीमुळे शाळेतून दूर राहणाऱ्या मुलांना पौष्टिक आहारासह शिक्षण देणे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश होता. ‘सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली मी एकमेव महिला मंत्री म्हणून महिला आणि बालकांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवत आहे.’ मुलांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये, हाच विभाग आणि माझा उद्देश आहे. लवकरच विजापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाला विभागाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta