
बेळगाव : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नाव उज्वल करणाऱ्या मलप्रभा जाधव या खेळाडूचे अभिनंदन एबीजी इंडस्ट्रियल प्रॉडक्ट यांच्यावतीने करण्यात आले. स्पर्धेत भाग घेण्यासाठी तिला जाताना शुभेच्छा व सहकार्य करण्यात आले होते. तिने तजिकिस्तान येथील दुष्मानी मध्ये झालेल्या एशियन ग्रास चॅम्पियनशिप स्पर्धेत 48 किलो वजन गटात कांस्य पदक पटकाविले असून त्या स्पर्धेत वीस देशाच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. तिने हे यश संपादन करून देशाचे नाव उज्वल केल्याबद्दल एबीजीचे संचालक आप्पासाहेब गुरव व लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष महादेव चौगुले यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी हनुमंत पाटील, चंद्रशेखर जोग, परशुराम धामणेकर, अर्जुन कुसमळकर, कपिल हनुमंताचे, सविता पाटील, अनुपमा पाटील, केदार जाधव, तुषार जाधव व राजू भोवी आदी उपस्थित होते. सत्काराबद्दल मलप्रभा जाधव हिने कृतज्ञता व्यक्त केली. येथील अनेक उद्योजकांकडून तिला अर्थसहाय्य करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta