

बेळगाव : सलग १४ व्या वर्षी कॅपिटल वन करंडकासाठी सुरू असलेल्या एकांकिका स्पर्धेदरम्यान करंडकाचे अनावरण अमाप उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री प्रमोद काळे, वामन पंडीत, व सुनील खानोलक यांच्या बरोबर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, व्हा. चेअरमन शाम सुतार उपस्थित होते.


प्रारंभी श्री चेअरमन हंडे यांनी १३ वर्षाच्या कालखंडाचे थोडक्यात विवेचन करून आजवर मान्यवर परीक्षक चोखंदर नाट्य रसिक व नाट्यकर्मींच्या सहकार्यामुळेच स्पर्धेमध्ये सातत्य राखण्यात आले असे नमूद केले.यावेळी बोलताना वामन पंडीत यांनी नाट्य रसिकांकडून मिळणाऱ्या भरघोस पाठिंबा व संस्थेने कष्टाने उभ्या केलेल्या या स्पर्धांचे स्वागत व प्रशंसा केली. यावेळी संस्थेचे संचालक रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, संजय चौगुले, शरद पाटील, लक्ष्मीकांत जाधव, सदानंद पाटील, सुभाष सुंणठणकर निळूभाऊ नार्वेकर.. व कर्मचारी वर्ग पिग्मी कलेक्टर उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धे मध्ये १८ स्पर्धक संघानी सहभाग दर्शविला असून आज या पैकी ९ संघानी सादरीकरण केले आहे. शेवटच्या एकांकिका नंतर मान्यवरांचा हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.


Belgaum Varta Belgaum Varta