
बेळगाव : येथील कंग्राळ गल्ली बुथ क्रमांक 13 मध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले. पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ लसीचे दोन थेंब देण्यात आले. पोलिओपासून संरक्षण मिळावे यासाठी सरकारच्या वतीने विशेष दक्षता घेऊन लसीकरण करण्यात येत आहे. उद्घाटनाचा हा कार्यक्रम येथील सावित्री बिल्डिंग हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटन कार्यक्रमास माजी महापौर श्री मालोजी शांताराम अष्टेकर, श्री राहुल गोपाळ निळकंठचे, सौ लक्ष्मी अमित उसूलकर, सौ प्रीती सचिन पाटील, सौ स्वाती निळकंठाचे, श्री भावकाणा पिरगाने व पंचमंडळी हजर होते. बुथवर संगीता पाटील, रेणुका करेगार, मालू बेळगावकर या अंगणवाडी शिक्षिका डॉक्टर फाईझान डॉक्टर प्रदीप सर यांनी कार्य केले.


Belgaum Varta Belgaum Varta