
बेळगाव : उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहित करण्याबरोबरच बेळगावची नाट्य परंपरा अखंड ठेवण्यासाठी कॅपिटल वन तर्फे कॅपिटल वन करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी मोठ्या दिमाखात दोन दिवसीय कॅपिटल वन करंडकाचे अनावरण करण्यात आले.
शनिवारी जिल्हा मर्यादित शालेय गटात स्पर्धा पार पडली. बेळगाव मधील बालकलाकारांसह महाराष्ट्रातील विविध कलाकारांचा अभिनय आणि विविध प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या एकांकिका यामुळे बेळगावातील रसिकांसाठी ही जणू एक पर्वणीच आहे तर रविवारी आंतरराज्य एकांकिका स्पर्धेला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


बळी या एकांकिका ने रविवारच्या एकांकिका स्पर्धेला प्रारंभ झाला. आयर्न वर्ल्ड स्कूल,वारजे यांच्यातर्फे सदर बळीही एकांकिका सादर करण्यात आली. समाजसेवकांच्या माध्यमातून बाल कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सदर एकांकिकेतून करण्यात आला. विविध प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या एकांकिका यावेळी सादर करण्यात आल्या.
यानंतर आयर्न वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी यांच्यातर्फे चेरी एके चेरी एकांकिका सादर करण्यात आली चेरी ही मुलांच्या आवडीच्या फळांवर आधारलेली एकांकिका होती.फळ खायला किती गोड लागतं मात्र त्याचं झाड वाढवणे आणि त्याची निगा करणे कशा पद्धतीचं कठीण काम आहे या आधारित मेहनतीवर आधारलेली ही एकांकिका सादर करण्यात आली.
यानंतर रंगभूमी ग्रुप बेळगाव यांच्यातर्फे इट्स कॉमन ही कैलास पर्वतावर कोसळलेला डोंगरांच्या पोकळीत डॉक्टर व मानसोपचार तज्ञ विचारांवर आधारित एकांकिका सादर करण्यात आली.
दुपारच्या सत्रात अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती सांगली यांच्यातर्फे इन सर्च ऑफ ही एकांकिका सादर करण्यात आली. रुद्र या पात्राच्या भावनांचे चित्रण करणारे सदर कथानक सुंदर पद्धतीने सादर करण्यात आले.
यानंतर क्रिएटिव क्रांती यांच्यातर्फे तळ्यात मळ्यात ही एकांकिका सादर करण्यात आली. आई वडील मुलगा आणि सून या चार पात्रात भोवती असणारी एकांकिका सून व मुलगा ज्या वेळेला विभक्त राहतात त्यावेळेला त्यांची झालेली अवस्था या सामाजिक भाषावर चित्रण करणारी सदर एकांकिका या ठिकाणी सादर करण्यात आली.
उत्तम अभिनय आणि दर्जेदार कथानक अशा स्वरूपात सादर होणाऱ्या एकांकिका रसिक श्रोत्यांसाठी नाटकांची जणू पर्वणीच ठरत आहेत.
रविवारीच आता सायंकाळच्या सत्रात तीन एकांकिका सादर होणारा असून यानंतर या एकांकिका स्पर्धेचा भव्यदिव्य असा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे.


Belgaum Varta Belgaum Varta