एप्रिल अखेरीस होणार योगी आदित्यनाथांच्या हस्ते उद्घाटन
बेळगाव : छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी निर्मितीचे कामकाज पूर्णत्वास आले असून एप्रिल अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली आहे.
बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, बेळगावमधील शिवसृष्टी हे आपले ड्रीम प्रोजेक्त आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित निर्माण करण्यात आलेल्या या कामकाजाची सुरुवात झाली. सुमारे 10 कोटी रुपयांच्या खर्चातून हि शिवसृष्टी साकारण्यात आली असून एप्रिल महिन्याच्या अखेरीस याचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते करण्याचा विचार आहे. यासंदर्भात लखनौ येथे त्यांची भेट घेण्यात येणार असून उद्घाटनाची तारीख ठरविण्यात येत असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले.
एकंदरीत बेळगावमधील बहुचर्चित, बहुप्रतीक्षित असलेली शिवसृष्टी अखेर बेळगावकरांसाठी उपलब्ध होणार आहे. बर्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या शिवसृष्टीचा अखेर उद्घाटनाची मुहूर्त काढण्यात येत असून बेळगावमधील समस्त शिवप्रेमींसाठी हि पर्वणी ठरणार आहे.