
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील खादरवाडी मराठी शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रगतीबद्दल आणि शैक्षणिक कार्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक दळवी यांनी सर्व उपस्थित नेत्यांचा आणि मान्यवरांचा परिचय करून दिला. या सोहळ्याला खादरवाडी मराठी शाळेचे शिक्षणप्रेमी आणि प्रसिद्ध उद्योजक रमेश पाटील, मनूर ग्रामपंचायत सदस्य साबरेकर, एसडीएमसीचे अध्यक्ष परसराम गोरल आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश माळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उत्तम पाटील, भारत बस्टवाडकर, देवाप्पा कोलेकर, राजू डोळकर, परशुराम पाटील यांच्यासह सर्व पालक वर्ग, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी बागेवाडी सर यांनी सर्वांचे आभार मानले आणि त्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शाळेच्या यशात शिक्षक आणि पालकांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
Belgaum Varta Belgaum Varta