Sunday , December 28 2025
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘समन्वय’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Spread the love

 

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अविट मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध

बेळगाव : द. म. शि. मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन ‘समन्वय’ मराठा मंदिर (खानापूर रोड, जक्केरी होंडा) येथे अत्यंत दिमाखात पार पडले. विविध कलागुण, संगीत आणि प्रबोधनात्मक नाटकांच्या सादरीकरणाच्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात विविध सुरावटींनी झाली. यामध्ये प्रार्थनागीत, देशगीते, लोकगीते, भावगीते आणि भक्तिगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. विशेषतः मुलांनी सादर केलेल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ आणि ‘वुमन क्रिकेट’ या नाटकांनी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवले. या नाटकांतून सामाजिक संदेश आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडवण्यात आले.

या सोहळ्यासाठी पहिल्या दिवशी डॉ. मिलिंद हलगेकर तर दुसऱ्या दिवशी डॉ. शैलेश पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी विक्रम पाटील सर, संगोळी सर, डी. बी. पाटील, शाळेचे संस्थापक व माजी चेअरमन डॉ. पी. डी. काळे, स्कूल एस.एम.सी. चेअरमन आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन आर. एस. पाटील, सेक्रेटरी नितीन घोरपडे, डॉ. डी. एन. मिसाळे, स्कूल प्रिन्सिपल सोनाली कंग्राळकर आणि ऍडव्हायझरी डायरेक्टर मायादेवी अगसगेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेतील शायनिंग स्टार्स विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नॅशनल लेव्हल स्विमिंग चॅम्पियन वेदांत मिसाळे आणि क्रिकेटपटू सिद्धार्थ अधिकारी यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.

मुख्य अतिथींनी आपल्या भाषणात पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जर आपल्याला मुले आज्ञाधारक आणि आत्मविश्वासू हवी असतील, तर पालकांनी त्यांच्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. मुलांवर प्रेम, त्यांच्याशी संवाद आणि शिस्त यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे.”

संस्थेचे चेअरमन आर. के. पाटील यांनी संदेश दिला की, “पालकांनी स्वतःची स्वप्ने मुलांवर न लादता, मुलांची स्वप्ने काय आहेत हे ओळखून ती पूर्ण करण्यासाठी त्यांना बळ द्यावे.”

ऍडव्हायझरी डायरेक्टर मायादेवी अगसगेकर यांनी शाळेच्या भविष्यातील ‘अपडेटेड’ योजना आणि प्रगतीचा आराखडा मांडला. मुख्याध्यापिका सोनाली कांग्राळकर यांनी शाळेचा वार्षिक प्रगती अहवाल वाचून दाखवला, ज्यातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे दर्शन घडले.

या सोहळ्याचे नियोजन आणि विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून उपस्थित पालकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. या यशस्वी कार्यक्रमामुळे ‘ज्योती सेंट्रल स्कूल’च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

About Belgaum Varta

Check Also

खादरवाडी मराठी शाळेचा आदर्श पुरस्काराने गौरव

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील खादरवाडी मराठी शाळेला आदर्श शाळेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *