
बेळगाव : बेळगावसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की मास्टर प्रेम यल्लाप्पा बुरुड यांची कर्नाटक संघाकडून ६० वी राष्ट्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२६ साठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २४ जानेवारी २०२६ रोजी रांची, झारखंड येथे होणार आहे.
यापूर्वी, म्हैसूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ६० वी कर्नाटक राज्य क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२५ मध्ये प्रेम यांनी २ कि.मी. धाव प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत ५ मिनिटे ४३ सेकंद या प्रभावी वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला आणि राज्य विजेता ठरला.
मास्टर प्रेम हे कावळेवाडी गाव, बेळगाव जिल्हा येथील रहिवासी आहे. ते एक स्पोर्ट्स कॅडेट असून सध्या आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी, मद्रास रेजिमेंट (MRC) सेंटर, वेलिंग्टन, उटी येथे इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये प्रेम याच्या आजींना तीव्र पक्षाघाताचा झटका आला असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. या कठीण काळात आजींना भेटण्याची त्याची मनापासूनची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेम सुट्टीवर बेळगावला आला होता. भावनिक अडचणी असूनही प्रेम याने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी गमावली नाही.
अढळ निष्ठा, मेहनत आणि एकाग्रतेच्या जोरावर त्यांनी स्पर्धेत सहभाग घेत विजय मिळवला आणि आपल्या आजी, आई-वडील, गाव तसेच संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचा अभिमान वाढवला.
या उल्लेखनीय यशामुळे त्यांना आता राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली असून बेळगाव व कर्नाटकाचा गौरव झाला आहे.
👉 सहकार्याचे आवाहन
आम्ही टीम फेसबुक फ्रेंड्स सर्कल तर्फे मास्टर प्रेम यल्लाप्पा बुरुड यांना रांची, झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२६ साठी जाण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी घेतली आहे.
तरी सर्व मित्र, हितचिंतक व समर्थकांनी पुढे येऊन या उदयोन्मुख खेळाडूस मदत करावी, जेणेकरून तो राष्ट्रीय स्तरावरही आपल्या भागाचे नाव उज्ज्वल करू शकेल, ही नम्र विनंती.
📞 संपर्क: संतोष दरेकर
प्रमुख – फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीम
📱 ९९८६८०९८२५
Belgaum Varta Belgaum Varta