Friday , March 6 2026
Breaking News

जीवनविद्या मिशनच्या वतीने विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रप्रगती व विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही रॅली सोमवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून सुरुवात होऊन किर्लोस्कर रोड, समादेवी मंदिर, राणी चन्नम्मा सर्कल, चव्हाट गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली येथून मारुती गल्ली मारुती मंदिर या ठिकाणी तिची सांगता होणार आहे.
सदगुरु श्री वामनराव पै यांच्या 103 व्या जयंती निमित्त ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची’ या घोषवाक्याखाली विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. ‘राष्ट्र हाच देव’ अशी शिकवण देणारी जीवनविद्या आपल्या राष्ट्राप्रती नागरिकांच्या मनात आदर, प्रेम, कर्तव्य भावना निर्माण करते व राष्ट्र हेच सर्वतोपरी असून राष्ट्राची प्रगती व त्याचे रक्षण हाच भारतातील प्रत्येक नागरिकाचा राष्ट्रधर्म असला पाहिजे हे ठासून सांगते.म्हणून हे तत्वज्ञान घराघरात गेलं पाहिजे यासाठी या विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या विश्वप्रार्थना रॅलीचे विविध प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होऊन विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ हे या रॅलीचे आकर्षण असणार आहे.जीवनविद्या मिशनची अनेक उपकेंद्रे यात विविध जीवंत देखावे सादर करणार आहेत.
समस्त बेळगाव व परिसरातील नागरिकांनी या विश्वप्रार्थना रॅलीमध्ये सहभागी होऊन राष्ट्राप्रति कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *