Tuesday , March 3 2026
Breaking News

DYES खेळाडूंची U-19 शालेय राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकांची हॅट्ट्रिक

Spread the love

 

बेळगाव : दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे दिनांक 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या U-19 शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत DYES, बेळगावच्या तीन ज्युडो खेळाडूंनी कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. त्यांनी एकाच दिवशी कांस्य पदकांची हॅट्ट्रिक साधत जिल्ह्याचा मान उंचावला.
🥉 स्पंदना सी.एस. – 40 कि.ग्रा.
🥉 स्वेता अलकनूर – 44 कि.ग्रा.
🥉 संगमेश मडाळी – 55 कि.ग्रा.
सुवर्ण व रौप्य पदक थोडक्यात हुकले असले तरी पंजाब, हरियाणा, मणिपूर, दिल्ली व जम्मू-काश्मीर या राज्यांतील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्यांनी जिद्द, चिकाटी व निर्भय खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
विशेष उल्लेखनीय म्हणजे संगमेश याने दोन आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांवर मात करत खऱ्या खेळाडू ची जिद्द व विजेतेपदाची मानसिकता दाखवली.
हे सर्व खेळाडू नेहरू नगर येथील DYES इनडोअर हॉलमध्ये NIS प्रशिक्षक सौ. रोहिणी पाटील व सौ. कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. तसेच उपसंचालक श्री. श्रीनिवास बी. यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत आहे.
त्यांचे यश हे कठोर परिश्रम, शिस्त व समर्पण याचे फलित असून त्यांनी कर्नाटक राज्य व बेळगाव जिल्ह्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *