Friday , April 17 2026
Breaking News

गुंजी येथे ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

गुंजी (प्रतिनिधी : संदीप घाडी) : गुंजी, ता. खानापूर येथे रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गाव स्वच्छता, कर भरणा, ग्रामविकास तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वाती जयकुमार गुरव, अध्यक्षा ग्रामपंचायत गुंजी, तसेच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव सोमाण्णा हलगेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार हलगेकर साहेब म्हणाले की, ग्रामपंचायत मॅरॅथॉन 2026 अशा स्वरूपाची स्पर्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आली असून, हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

या कार्यक्रमास माननीय विठ्ठलराव सोमाण्णा हलगेकर (आमदार, खानापूर तालुका), स्वाती जयकुमार गुरव (अध्यक्षा, ग्रामपंचायत गुंजी), राजाराम देसाई (निवृत्त मॅनेजर, IDBI बँक), खेमाण्णा महादेव घाडी (अध्यक्ष, सातेरी माऊली पतसंस्था), प्रकाश गावडे (अध्यक्ष, कृषी पत्तीन पतसंस्था), विनोद मुतगी (PDO ग्रामपंचायत गुंजी), मल्लारी करंबळकर, अमोल बेळगावकर, प्रताप नाळकर, सुभाष घाडी, रावजी बिर्जे, कलाप्पा बिर्जे, पावसकर (PE शिक्षक, हायस्कूल), जांगळे (PE शिक्षक, प्राथमिक शाळा), शिंदे सर (मॅरेथॉन अकॅडमी खानापूर), ओमकार (PE शिक्षक, SPS खानापूर) तसेच गुंजी ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी व गावातील प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुंजी ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 या स्पर्धेत सुमारे 500 ते 600 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा 5 कि.मी. व 10 कि.मी. अशा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या.

5 कि.मी. स्पर्धा निकाल
18 वर्षांखालील पुरुष गटात प्रथम क्रमांक मधुसूदन काळीचे, द्वितीय क्रमांक कृष्णा पाटील, तृतीय क्रमांक ईश्वर लोहार यांनी मिळविला.
महिला गटात प्रथम क्रमांक पूर्णिमा, द्वितीय क्रमांक गोपिका काळीचे, तृतीय क्रमांक काजल गावडे हिने मिळविला.

18 वर्षांवरील पुरुष गटात प्रथम क्रमांक श्रीनाथ करंबळकर, द्वितीय क्रमांक अनिश बांदोडकर, तृतीय क्रमांक व्यंको घाडी यांनी मिळविला.
महिला गटात प्रथम क्रमांक सँथीया पिंटो, द्वितीय क्रमांक श्रावणी शास्त्री, तृतीय क्रमांक हर्षदा मन्नोळकर हिने मिळविला.

10 कि.मी. स्पर्धा निकाल
18 वर्षांवरील पुरुष गटात प्रथम क्रमांक श्रीहरी करंबळकर, द्वितीय क्रमांक रोहित अळवणी, तृतीय क्रमांक कार्तिक बिर्जे यांनी मिळविला.
महिला गटात प्रथम क्रमांक प्रतीक्षा घाडी, द्वितीय क्रमांक तनिष्का तानाजी गोरल, तृतीय क्रमांक विद्या गोडसे हिने मिळविला.

18 वर्षांखालील पुरुष गटात प्रथम क्रमांक नागराज आळवणे, द्वितीय क्रमांक तेजस गुरव, तृतीय क्रमांक परशराम करंबळकर याने मिळविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना पदके, चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुंडू करंबळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मल्लारी करंबळकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *