
मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली पीडीओना निवेदन
देसूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मनरेगा’ (MNREGA) योजनेचे नाव बदलण्याच्या हालचालींचा देसूर काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला आहे. युवा नेते मृणाल दादा हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देसूर येथील ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना (PDO) यासंदर्भात एक विशेष निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, मनरेगा ही ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचा रोजगार देणारी योजना आहे. या योजनेशी सामान्य जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत, त्यामुळे या योजनेचे मूळ नाव बदलण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.
निवेदनातील मुख्य मुद्दे:
मनरेगा योजनेचे नाव बदलण्यास देसूर काँग्रेसचा पूर्णतः विरोध.
योजनेच्या मूळ उद्देशाला धक्का न लावता ती अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी.
नाव बदलल्यास दिली मधे तीव्र आंदोलनाचा इशारा.
यावेळी देसूर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta