Sunday , July 26 2026
Breaking News

आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘उमापुत्र चिटफंड’ उपयुक्त

Spread the love

 

समाधी मठातील प्राणलिंग महास्वामींचा विश्वास

निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी जागृत राहून संबंधित संस्थेची चाचणी करून योग्य ठिकाणी आर्थिक पुंजीची गुंतवणूक केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासह चांगला परतावा देण्यासाठी किरणसिंग राजपूत यांनी
भविष्यातील आर्थिक गुंतवणूक आणि अधिक लाभाच्यादृष्टीने निपाणी येथे ‘उमापुत्र’ चिट फंड्स संस्था सुरू केली आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करेल. आर्थिक गुंतवणीसाठी ही संस्था उपयुक्त आहे, असा विश्वास येथील चिक्कोडी रोडवरीलसमाधी मठाच्या प्राणलिंग स्वार्मीनी व्यक्त केला. निपाणी येथील ग्रीन पार्क येथे नव्याने स्थापन झालेल्या संस्थेच्या कार्यालय उद्घाटन करून ते बोलत होते.
संस्थेचे संचालक किरणसिंग राजपूत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्राणलिंग स्वार्मीच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यापूर्वी नूतन सत्यनारायण पूजा झाली. कार्यालयात
किरणसिंग राजपूत यांनी संस्थेची फंडस्’ पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सभासदांच्या हिताचे रक्षण ही संस्थेची प्रमुख ध्येये राहतील, असे सांगितले.
सुभाषसिंग राजपूत यांच्या हस्ते प्राणलिंग स्वामींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालिका रागिनी राजपूत, सविता झळके, शिवसिग राजपूत, दयानंद झळके, सुहास जाधव, रवींद्र शिंदे, राजाराम यादव, हर्षा शेट्टी, चंद्रकांत माळगे, मंगेश पाटील, विजय पाटील, सोमशेखर कानडे, मेजर बाबुराव पाटील, बाळासाहेब जाधव, राजेंद्र टोपे, काशीमखान पठाण, प्रिती सत्यनायक, पूजा मुरगोड, स्नेहल परमणे, तृप्ती आरकसाळे, निर्मला कराडे यांच्यासह गुंतवणूकदार व मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *