Sunday , July 26 2026
Breaking News

कौटुंबिक वादातून सफाई कामगाराची किल्ले तलावात आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमधील प्रसिद्ध किल्ले तलावात एका सफाई कामगाराने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक कलह आणि दारूच्या व्यसनामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात असून, घटनास्थळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शहापूर येथील घाडे कॉलनीतील रहिवासी सुभाष हलगेकर (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुभाष आणि पत्नी मेघा यांच्यात सातत्याने वाद होत असल्याने मेघा गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होत्या. पत्नी माहेरी गेल्यापासून सुभाष बेपत्ता होते, ज्याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. आज सम्राट अशोक चौकाजवळील किल्ले तलावात त्यांचा मृतदेह आढळला असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांनी मदतीने तो बाहेर काढला. पतीला दारूचे व्यसन असल्याने घरात वारंवार वाद होत होते. त्यांनी दारू सोडावी यासाठीच आम्ही त्यांना सांगत होतो, मात्र त्यांचा कोणताही छळ केला नसल्याचे मेघा यांनी स्पष्ट केले. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. व्यसन आणि कौटुंबिक अशांततेमुळे एका तरुणाने आपला जीव गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *