Tuesday , March 3 2026
Breaking News

युवा समिती बेळगावच्या वतीने १ मार्च २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शनिवार १४ रोजी युवा समिती कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीत १ मार्च २०२६ रोजी मराठा मंदिर येथे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षिस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण आणि मराठी भाषा गौरव दिन सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या सुरवातीला महाराष्ट्राचे पूर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, मागील महिन्यात संपन्न झालेल्या भव्य सामान्यज्ञान स्पर्धेत जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली होती. या स्पर्धेतील चार गटामध्ये यशस्वी स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा तसेच दरवर्षीप्रमाणे मराठी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव आणि खानापूरमधील पाच शाळांना आदर्श मराठी शाळा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्षी त्यासाठी २१ शाळांनी अर्ज केला असून पुढील आठवड्यात सदर पुरस्कार जाहीर करण्यात येतील आणि त्याचा पुरस्कार वितरण सोहळा १ मार्च रोजी आयोजित येत आहे. तसेच मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी मध्ये बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर शैक्षणिक विभागातील पहिल्या तीन अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल अशी माहिती दिली. या कार्यक्रमात स्पर्धक, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले.
सदर बैठकीला कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासु सामजी, राजू कदम, विनायक कावळे (खजिनदार), किरण हूद्दार, महांतेश आलगोंडी, सुरज कुडुचकर, प्रतीक पाटील, आकाश भेकणे, सौरभ तोंडले, अश्वजीत चौधरी, अक्षय बांबरकर, प्रवीण धामणेकर, निखिल देसाई, आशिष कोचेरी आदी उपस्थित होते. श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले.

आवाहन
२०२४- २५ शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी मध्ये बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर अशा तिन्ही शैक्षणिक विभागातील पहिल्या तीन अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार दरवर्षी प्रमाणे करण्यात येणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी अव्वल गुण घेऊन पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे त्यांनी सरचिटणीस श्रीकांत कदम ७०१९६६८०२५ यांच्याशी संपर्क साधला असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *