Monday , June 1 2026
Breaking News

शेंगदाणा पावणे दोनशे पार, भगर दीडशेहे

Spread the love

 

उपवास निरंकार; महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फराळ महागला

निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवास करणाऱ्या भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. येथील बाजारपेठेत फराळाच्या साहित्याचे दर कडाडले असून केवळ सुका मेवाच नाही, तर साध्या फळांचेही दर गगनाला भिडले आहेत. विशेषता शेंगदाण्याने पावणे दोनशे पार तर भगर दीडशेहे रुपये किलो पर्यंत मजल मारली आहे. या दरवाढीने सर्वसामान्यांना नाकीनऊ आणले असून महाशिवरात्री च्या तोंडावर भगरीत भेसळीची शक्यता व्यक्त केले जात आहे.
वाढत्या दराचा फायदा घेत काही ठिकाणी भगरीत (वरीचे तांदूळ) भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुना साठा किंवा हलक्या प्रतीचा माल मिसळून विक्री केली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना पॅकिंगवरील ‘मार्क’ तपासूनच खरेदी करावी लागणार आहे. यावर्षी शेंगदाण्याच्या किमतीने काही वर्षातील विक्रम मोडीत काढले आहेत. एरव्ही १०० ते १२० रुपये किलो दराने मिळणारा शेंगदाणा आता उच्चांकी दरावर पोहोचला आहे.
—-
केळी, बटाटा चिप्सची मागणी वाढली
तयार फराळाच्या पदार्थांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. विशेषतः केळी वेफर्स आणि बटाटा चिप्सची विक्री जोरात सुरू आहे. उपवासाच्या दिवशी झटपट फराळ म्हणून या पदार्थांना पसंती दिली जात आहे.
—-
उपवासाच्या पदार्थांचे दर (दर प्रति किलो)

*शेंगदाणा * १६० – १८०
*भगर *१२० – १६०
*राजगिरा * १०० – १४५
*साबुदाणा *७० -९०
*बटाटे * २५ -३०
*खाद्यतेल १४०-१७०

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *