Sunday , July 26 2026
Breaking News

महाअभिषेक, महाप्रसादाने साई महोत्सवाची सांगता

Spread the love

 

साईस्तवन मंजिरीचे सामूहिक पारायण; दिवसभर भाविकांची गर्दी

निपाणी (वार्ता) : निपाणीयेथील साईशंकर नगर मधील साई मंदिरात दोन दिवसापासून आयोजित साई यात्रा महोत्सवात पालखी मिरवणुक, अभिषेक, पूजा, महाअभिषेक, महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता.१४) रात्री शेजारतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
शनिवारी (ता. १४ रोजी पहाटे काकड आरती, सकाळी बाबुराव महाजन- महाराज यांच्या पौरोहित्याखाली डॉ. जोतिबा चौगुले व डॉ. राजश्री चौगुले यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली. ९ ते ११ पर्यंत आयोजित साई स्तवन मंजिरीचे सामूहिक पारायण सोहळ्यामध्ये ५० जणांनी सहभाग घेतला होता. सकाळी ११ वाजता प्राणलिंग स्वामींचे आशीर्वचन, १२ वाजता मध्यान्ह आरती झाल्यावर महाप्रसादाचे वाटप झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजता नागराळ येथील शिवलिंगेश्वर शिव भजनी मंडळ, निपाणीतील साई महिला भजनी मंडळ, वीरभद्र महिला भजनी मंडळ यांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.
यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील, सुरेश शेट्टी, दिलीप पठाडे, डॉ. साईनाथ पाटील, पुंडलिक वागळे, ॲड. राम चव्हाण, मेजर बाबुराव पाटील, सुदर्शन आंबी, श्रीपती मिरजकर, धनंजय जाधव गणेश जासूद विजय वरूटे, राहुल मुर्तुले, विश्वनाथ दुमाले, अमित साळवे, नाना जाधव, धनाजी भाटले, दीपक माने, पप्पू शिंदे, विनोद दुमाले, गजानन भालेबालदार, सुदर्शन आंबी, नाना मिरजकर, मनोज पणदे, सोमनाथ परमणे यांच्यासह महिला आणि भाविक उपस्थित होते. दिवसभर दर्शनासह महाप्रसादासाठी शहर आणि उपनगरातील भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. सायंकाळी अमृतानंद महाराजांचे प्रवचन, भजन सेवा, सायंकाळी ६ वाजता सुभाष देसाई यांचे व्याख्यान ७ वाजता धुपारती, ८ वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *