Friday , April 17 2026
Breaking News

डोंगराळ भागाच्या पाण्यासह रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील ; शेंडूर, गोंदूकुप्पीतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

निपाणी (वार्ता) : निरंतरपणे समाजसेवा आणि निवडणुकीच्या वेळी राजकारण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आमच्या पाठीशी सदैव आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत महिलांच्या विकासात्मक धोरणांवर कार्य सुरू आहे. डोंगराळ भागात असलेल्या शेंडूर, गोंदूकुप् पीपरिसरात रोजगारनिर्मिती वाढवणे, युवकांना स्थानिक स्तरावर संधी उपलब्ध करून देणे. विकासात्मक गावागावात पोहोचविण्याचा आपण संकल्प केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा स्वीकारली असून नेहमीच आपण त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दिली. शेंडूर आणि गोंदुकुप्पीतील कार्यकर्ते व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार गट) पक्षप्रवेश केला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून बैठकीचे उद्घाटन झाले. उत्तम पाटील म्हणाले, कार्यकर्ता हाच माझा खरा पक्ष आहे. माझ्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. तुमच्या प्रत्येक अडचणीत व संकटात मी सदैव तुमच्या सोबत पावलाला पाऊल देत उभा राहीन. त्यासाठी कार्यकर्ते व नागरिकांनी आपल्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून उत्तम पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेतली. उत्तम पाटील यांच्या गटात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अर्जुन नाईक, भिमराव नाईक, सुनील नाईक, गणपती नाईक, सुनील तोंदले, मलगोंडा माने, संदीप पाटील, जयदीप भाट, अमृत शेवाळे, पिंटू शेवाळे, रामदास पाटील, पांडुरंग कांबळे, मारुती पाटील, पप्पू कांबळे, भैरू कांबळे, तानाजी ढेरे, मारुती तोडकर, रामा भोंगाळे, प्रसाद बर्गे, सागर तोडकर, मल्लाप्पा नाईक, नारायण सुतार यांच्यासह शेंडूर, गोंदूकुप्पी परिसरातील उत्तम पाटील युवा शक्ती पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *