Sunday , July 26 2026
Breaking News

श्री गुरुदेव रानडे मंदिरच्या शताब्दी महोत्सवानिमित्त “स्वरसंध्या” संगीत मैफलीने श्रोते मंत्रमुग्ध

Spread the love

 

बेळगाव : हिंदवाडी येथील विख्यात श्री गुरुदेव रानडे मंदिरच्या अकॅडमी ऑफ कॉम्परेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनला 100 वर्षे पूर्तीनिमित्त शताब्दी महोत्सवांतर्गत गुरूवारी सायंकाळी मंदिरच्या दिव्य सभागृहात आयोजित भक्तीरसपूर्ण “स्वरसंध्या” कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
गायक विनायक मोरे, ऋषिकेश हेर्लेकर, योगेश रामदास, गायिका सुलक्षणा देसाई, अक्षता मोरे यांनी एकाहून एक विविधढंगी भक्तीगीते, अभंग, भजन, दासपदे प्रस्तुत करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना हार्मोनियमवर मुकुंद गोरे, तबल्यावर अंगद देसाई व पखवाजवर ज्ञानेश्वर पाटील यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. दोन तास रंगलेल्या या संगीत मैफलीत रसिक श्रोते भारावून गेले.
प्रारंभी आरती आपटे यांनी कलाकारांची ओळख करून दिली. सचिव ॲड. एम्. बी. जिरली यांच्या हस्ते कलाकारांना खास सन्मानित करण्यात आले. विश्वस्त सुब्रमण्य भट यांनी आभार मानले. कार्यक्रमास मान्यवर व रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *