Sunday , July 26 2026
Breaking News

चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीच्या वतीने २२ फेब्रुवारीला भव्य कुस्ती मैदान

Spread the love

 

बेळगाव : चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी आनंदवाडी येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक मल्लविद्या जिवंत ठेवणे आणि लहान मुलांना कुस्तीची प्रेरणा देणे हा समितीचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

गेल्या २६ वर्षांपासून समिती सातत्याने कुस्ती मैदान भरवत असून बेळगावकरांच्या सहकार्याने या परंपरेला बळ मिळत आहे. यंदाच्या मैदानात प्रमुख आकर्षण म्हणून बेळगावचा उगवता तारा व डबल कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव (कंग्राळी) आणि महाराष्ट्र चॅम्पियन अक्षय चौगुले (भोसले तालीम व्यायाम शाळा) यांच्यात रंगणारी लढत ठरणार आहे.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील (ता. गुडगिरी) विरुद्ध सौरभ माळकर (पवार तालीम, सांगली) यांच्यात होईल. तिसऱ्या क्रमांकावर प्रथमेश हट्टीकर (कंग्राळी) विरुद्ध यश पाटील (ता. पट्टणकोडोली), चौथ्या क्रमांकावर पृथ्वीराज पाटील (कंग्राळी) विरुद्ध सुरेश लंगोटी (अथणी स्पोर्ट्स हॉस्टेल) आणि पाचव्या क्रमांकावर निखिल पाटील विरुद्ध बसवराज जगदाळ (ता. मठपती आखाडा) यांच्यात झुंज रंगणार आहे.

याशिवाय लहान-मोठ्या मिळून ६० हून अधिक कुस्त्या होणार असून महिला पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी दहा स्वतंत्र कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आनंदवाडी येथे मल्लविद्येचा थरार अनुभवण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *