Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता खानापूर- जांबोटी बसच्या वेळेत बदल करावा

  खानापूर : आज सरकारी पूर्ण प्राथमिक शाळा ओलमणी व राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी यांच्यावतीने खानापूर बस डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले. खानापूर जांबोटी मार्गावरील मोदेकोप, उतोळी, दारोळी या गावांमधील विद्यार्थी या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. जवळजवळ 35 ते 40 विद्यार्थी हे शिक्षणाकरिता ओलमणीच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये …

Read More »

ज्योती ॲथलांटिक स्पोर्ट्स क्लब बेळगावचे सुयश

  खानापूर : दिनांक 6 व 7 जून 2024 रोजी उडपी या ठिकाणी कर्नाटक राज्य पातळीवरील ॲथलांटिक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा उडपी जिल्हा हौशी ॲथलांटिक स्पर्धा संघटना उडपी यांच्यावतीने संपन्न झाल्या. या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कुमार वैभव मारुती पाटील व कुमार भूषण गंगाराम गुरव या खानापूर तालुक्यातील स्पर्धकांनी भाग …

Read More »

चन्नेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी क.नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी श्री. भीमाशंकर यांचेकडे अध्यक्ष, ग्रामविकासाधिकारी यांच्या नावे दोन मागण्यांची दोन निवेदने सादर केली. पहिल्या निवेदनात गेली काही वर्षे बंद असलेली प्राथमिक शाळा गावकऱ्यांच्या प्रयत्नातून १ जून पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शाळा व अंगणवाडी एकाच खोलीत भरविली जात …

Read More »

हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूल येथे वृक्षारोपण

  खानापूर : वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असून वृक्ष लागवड करून न थांबता त्यांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक किरण देसाई यांनी केले आहे. पर्यावरण दिनानिमित्त हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूल येथे विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना …

Read More »

अखेर चन्नेवाडी शाळेची घंटा वाजली…

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेल्या शाळेला आज सुरुवात झाली. गेल्या महिन्याभरापासून पालक व गावकऱ्यांनी तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांची भेट घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते, त्यानंतर बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. मोहनकुमार हंचाटे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या …

Read More »

वनजमिनींवरील दाव्यांकरिता आलेल्या अर्जांच्या तपासणीला सुरुवात

  खानापूर : खानापूरात वनक्षेत्रात येणाऱ्या विविध गावांतील अनुसुचित जाती, जमाती व अन्य वननिवासी लोकांना अरण्य हक्क व वन जमिनी मिळवून देण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समिती गेली तीन चार वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक बैठका, शिबीरे, कार्यशाळा आदिंच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये व लोकांच्यात त्यांच्या हक्काधिकाराबाबत जागृती करून व धरणे, मोर्चे …

Read More »

उचवडे येथील महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात

  खानापूर : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर हे होते. प्रारंभी वाचनालयाचे सचिव प्रा. महादेव खोत यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले. तर वाचनालयाचे …

Read More »

खानापूर येथील जवानाचे निधन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील सैनिक मंजुनाथ अंबडगट्टी (वय ३५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 16 वर्षांपासून मंजुनाथ हे भारतीय लष्कराच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. गेल्या शुक्रवारी एका अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना दिल्लीतील मिलिटरी बीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; खानापूर तालुका समितीच्यावतीने आवाहन

  खानापूर : 1986 मध्ये झालेल्या कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी (ता.१) रोजी सकाळी साडेआठ वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी मराठी भाषिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तरीही …

Read More »

78 हजार किमतीचे म्हशीचे मांस जप्त; खानापूर पोलिसांची कारवाई

  खानापूर : बेळगाव-गोवा मार्गावरील गुंजी येथील माऊली देवस्थान जवळील वळणावर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी अज्ञात व्यक्ती गोमांस विक्रीच्या तयारीत असल्याच्या माहितीच्या आधारे खानापूर पोलिसांनी एक महिंद्रा बोलेरो गाडी व त्यामध्ये असलेले 78 हजार रुपयांचे म्हशीचे 600 किलो मांस जप्त करण्यात आले. परंतु मांस विक्री करणारे गाडी …

Read More »