खानापूर : श्री दत्त पद्मनाभ पिठाधीश्वर, अध्यात्म शिरोमणी, पद्मश्री विभूषित, गोवा स्वामी, प पू.सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत समाज खानापूर विभागाच्या वतीने गोवा राज्यातील कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठात श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात सद्गुरुंची पाद्यपूजा …
Read More »भाजप जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्षपदी सदानंद पाटील
खानापूर : खानापूर तालुक्यातील तरुण नेतृत्व सदानंद मारुती पाटील यांची भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण जिल्हा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील बिदरभावी गावचे युवा उद्योजक सदानंद पाटील यांनी अल्पवयातच आपल्या राजकीय कार्याचा ठसा उमटवला आहे. खानापूर येथील महालक्ष्मी शुगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी …
Read More »रवळनाथ हायस्कूल, शिवठाण (ता. खानापूर) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा कार्यक्रम उत्साहात
खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, येळ्ळूर संचलित रवळनाथ हायस्कूल, शिवठाण (ता. खानापूर) येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून मणतुर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. एम. पाटील उपस्थित होते, तर लोंढा रेंजचे रेंज फॉरेस्ट अधिकारी श्री. …
Read More »कोडचवाड ग्रामपंचायतीचे सदस्य राजूगौडा पाटील यांचा हिरेबागेवाडीजवळ अपघातात मृत्यू
खानापूर : हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ग्रामपंचायत सदस्याचा जागीच मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील अवरोळी गावातील रहिवासी आणि कोडचवाड ग्रामपंचायतीचे चार वेळा सदस्य राहिलेले राजूगौडा पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला. ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. …
Read More »पुस्तकातील चुका सुधारा, शिक्षकांच्या बदल्या थांबवा : प्रसाद पाटील यांचे क्षेत्रशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांच्या सर्वच पुस्तकात अनेक चुका असून त्या तात्काळ सुधाराव्यात तसेच तालुक्यातील शिक्षकांच्या तालुक्याबाहेरील बदल्या थांबवा, अशी मागणी गर्लगुंजी ग्रा. पं. माजी सदस्य प्रसाद पाटील व निट्टूर शाळा सुधारणा समिती अध्यक्ष नागराज देसाई यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामप्पा यांना निवेदन सादर केले …
Read More »आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
महिलांसाठी मोफत सल्ला शिबिराची घोषणा! खानापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिन खानापूर येथील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उत्साहाने आणि कृतज्ञतेने साजरा करण्यात आला. आरोग्यसेवा क्षेत्रात तसेच समाजात महिलांचे अमूल्य योगदान ओळखण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे कर्मचारी, रुग्ण आणि डॉक्टर उपस्थित होते आणि त्यांनी महिलांच्या सामर्थ्याचा व आत्मविश्वासाचा …
Read More »जांबोटीत सायकल स्पर्धेचा थरार, दत्तराज सडेकर याने मारली बाजी
जांबोटी : जिंकण्यासाठीचा प्रचंड आत्मविश्वास त्यातून चाकाने घेतलेला भरधाव वेग, प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून पुढे जाण्याची धडपड, अन प्रेक्षकात होणारा जल्लोष असा सायकलिंग स्पर्धेचा थरार जांबोटी येथे अविस्मरणीय ठरला. गिअरहेड स्टुडिओज बेळगाव व विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय जांबोटी यांच्या संयुक्त विद्यमाने सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण …
Read More »कणकुंबी हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि बक्षिस वितरण संपन्न
कणकुंबी : विश्व भारत सेवा समितीच्या कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयातील दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि शिष्यवृत्ती वितरण असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीत आणि ईशस्तवनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फोटो पूजन करण्यात आले. यावेळी …
Read More »खानापूरच्या माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांची काँग्रेस महिला राष्ट्रीय अधिवेशनात उमटली छाप
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील इंदिरा भवन येथे आयोजित ओबीसी काँग्रेस महिला राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडले. या अधिवेशनास देशभरातून अनेक महिला प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला. या अधिवेशनादरम्यान खानापूरच्या माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी देखील सहभाग घेतला होता. …
Read More »नारीशक्तीत देश चालवण्याची ताकद; महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा
खानापूर : नारीशक्ती ही फार मोठी शक्ती असून महिला तालुका, जिल्हा तसेच देशही सक्षमपणे चालवू शकते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा केला जातो, असे मत पंचहमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. खानापूर तालुका पंचहमी योजना समितीच्या वतीने मंगळवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta