Saturday , August 29 2026
Breaking News

श्री दत्त पद्मनाभ पीठात ‘श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव’ उत्साहात संपन्न

Spread the love

 

खानापूर : श्री दत्त पद्मनाभ पिठाधीश्वर, अध्यात्म शिरोमणी, पद्मश्री विभूषित, गोवा स्वामी, प पू.सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत समाज खानापूर विभागाच्या वतीने गोवा राज्यातील कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठात श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात सद्गुरुंची पाद्यपूजा आणि महाआरती अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. त्यानंतर राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी समाधी मंदिरात पूजन, एकमुखी दत्त मंदिरात पूजा तसेच हातुर्ली मठात विधिवत पूजाविधी संपन्न झाले. संपूर्ण परिसर दत्तनामाच्या गजराने आणि भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

दुपारच्या सत्रात पूज्य सद्गुरु माऊलींचे विशेष मार्गदर्शन सर्व शिष्यांना लाभले आणि दत्तमाला मंत्राचे अखंड नामस्मरण करण्यात आले.

संध्याकाळच्या प्रकट कार्यक्रमात पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांनी आशीर्वादपर निरूपण करताना सांगितले की, “प्रत्येकाने आपल्या जीवनात अध्यात्माला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे आणि आध्यात्मिक मूल्यांनुसार जीवन जगले पाहिजे. विशेषतः तरुणाईने देव, देश आणि धर्मकार्यामध्ये अग्रभागी राहून आपला मनुष्य जन्म सार्थकी लावावा.”

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. रवी कोकितकर (अध्यक्ष – हिंदू राष्ट्र सेना, कर्नाटक राज्य), श्री. चेतन मनेरिकर (भाजप), डॉ. स्वप्नील नागवेकर अध्यक्ष सद्गुरु कौन्सिल दुबई आणि श्री रोहन देसाई (बीसीसीआय माजी सचिव) उपस्थित होते. त्यांनी सद्गुरुंचे आशीर्वाद प्राप्त केले.

या भक्ती उत्सवामुळे खानापूर विभागात गुरुभक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा दिव्य संगम अनुभवास आला. हजारो भाविकांनी सद्गुरुंचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले आणि आध्यात्मिक जीवन जगण्याचा दृढ संकल्प केला.
या भक्ती उत्सवासाठी खानापूर–बेळगाव विभागातून हजारो सद्गुरुभक्त, सेवक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिकतेच्या दिव्य संगमाने ओतप्रोत भरून गेला.

About Belgaum Varta

Check Also

देशसेवेत रमलेल्या वीर मनगटावर म. मं. ताराराणीच्या लेकींची उमटली रेशीम धाग्यांची साक्ष

Spread the love  म. मं. ताराराणी महाविद्यालयात रक्षाबंधन सोहळा अनोख्या देशभक्तीने साजरा खानापूर : म. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *