Saturday , August 29 2026
Breaking News

जिजाऊ महिला मंडळ कंग्राळ गल्ली यांच्या वतीने महिला दिन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील कंग्राळ गल्ली जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून शोभा लोकुर उपस्थित होत्या. सुरुवातीस सर्व उपस्थितांचे स्वागत करून उपाध्यक्षा अनिता शंभूचे यानी प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन आणि राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन शोभा लोकुर यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा सौ. चंद्रभागा सांबरेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तर मिलन बडवानाचे यांनी प्रमुख पाहण्यांचा परिचय करून दिला. सौ. लक्ष्मी उसूलकर व रेणुका कोकितकर यांनी सर्व उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले. अदिती पवार यांनी अहवाल वाचन करून गतवर्षाच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्या लोकूर यांनी नर्मदा परिक्रमा या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विवेचन यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी महिला मंडळाच्या कार्याचा गौरव केला. सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून मंडळाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात गल्लीतील ज्येष्ठ नागरिक शंकर बडवानाचे, अशोक कंग्राळकर, बाबुराव कुट्रे, अंजनाताई शंभूचे व महिला उपस्थित होत्या. गल्लीतील ज्येष्ठ नागरिक श्री. अनंतराव पाटील व सौ. विजया पाटील यांच्या लग्नाला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महिला मंडळाच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यानंतर महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ पार पडला. सुनिता शंभूचे यांनी विजेत्यांची यादी वाचली. डॉक्टर स्वाती खंडागळे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुतार यांनी केले. अनंतराव पाटील यांच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

भारत विकास परिषदेच्यावतीने “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा-परिक्षा

Spread the love  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *