Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

गणेबैल टोलनाका मनमानी कारभाराविरोधात कॉंग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

  खानापूर : गणेबैल येथील टोलनाक्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील नागरिक, शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर रास्ता रोको करून आंदोलन केले. कित्येक महिने उलटून गेले तरी एनएचएआयने व केंद्र सरकारने आपला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांना भरपाई दिली गेली नाही. तसेच टोलपासून साधारण 5 किमी च्या अंतरातील सर्व गावातील वाहनांना टोल …

Read More »

हडलगा येथे बसची सोय करा; विद्यार्थी, समितीची मागणी

  खानापूर : हडलगा येथे बस फेरी सुरू करावी याचे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून खानापूर डेपो मॅनेजरना आज निवेदन देण्यात आले. हडलगा ता. खानापूर येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून सरकारी बसची मागणी केली होती, याची दखल खानापूर म. ए. समिती व युवा समिती खानापूर यांनी घेत …

Read More »

बेकवाड येथील व्यक्तीने केला पत्नीचा खून! वास्को गोवा येथील घटना

  खानापूर : बेकवाड (ता. खानापूर) येथील पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करून खून केल्याची घटना वास्को-गोवा येथे शुक्रवारी दुपारी घडली. वैशाली चाळोबा केसरेकर (वय 39) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती चाळोबा गुणाजी केसरेकर (वय 45) याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, …

Read More »

झुंजवाड (के एन) येथे विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने एकाचा जागीच मृत्यू

    खानापूर : खानापूर तालुक्यातील झुंजवाड (के एन) येथे पत्र्याच्या शेडला विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने निवाऱ्याखाली थांबलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पावलेल्या युवकाचे नाव मोहन (दीपक) नारायण पाटील (वय 38) रा. झुंजवाड के. एन. असे आहे. याबाबत मिळालेली माहिती की, झुंजवाड के एन येथे श्री. …

Read More »

खानापूर फिश मार्केटमध्ये 80 किलोचा मासा

  खानापूर : खानापूर फिश मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण नेहमीप्रमाणे जून महिन्यापासून समुद्रामध्ये मासेमारीला बंदी घातली जाणार आहे. त्यानंतर समुद्राचे ताजे मासे खाण्यासाठी मिळणार नाहीत. म्हणून खवय्यांची गर्दी वाढत असून प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. फिश मार्केटमधील रोहित पोळ, यांच्या एम जी पी …

Read More »

खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

  पुराचा सामना करण्यासाठी खबरदारी घ्या : सीईओ राहुल शिंदे खानापूर : यावर्षी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तालुक्यातील सर्व गावांमध्ये अतिवृष्टी व पुराचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या. बुधवारी (मे-२२) त्यांनी तालुक्यातील लोंढा ग्रामपंचायतीतील अतिवृष्टी व पांढरी …

Read More »

खानापूर बस स्थानक फलकावर मराठीला स्थान द्यावे

  खानापूर : लवकरच उद्घाटन होणाऱ्या खानापूर येथील नूतन बस स्थानकावर मराठी फलकाना स्थान द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच याबाबत बुधवारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. खानापूर येथे नवीन बस स्थानक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले …

Read More »

टीसीसह पाच जणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू

  खानापूर : तिकीट तपासण्यासाठी आलेल्या टीसीवर प्रवाशाने प्राणघातक हल्ला केला असता टीसीला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चार जणांवर प्राणघातक हल्ला झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर बेळगाव येथे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चालुक्य एक्सप्रेस (पॉंडेचेरी-दादर) रेल्वेमध्ये टीसी प्रवाश्यांचे तिकीट …

Read More »

मणतुर्गे येथील ग्रामदैवत रवळनाथ मंदिराचा पायाभरणीचा समारंभ

  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी बुधवार दिनांक १५ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्लिंथ (बीम) भरणी समारंभ गावचे वतनदार श्री. राजाराम दत्तू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी मंदिराचे पुजारी श्री. जोतिबा दत्तू गुरव यांच्या हस्ते श्री रवळनाथाचे पुजन करण्यात आले. तसेच …

Read More »

शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा सीमाभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

    खानापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. उदय पाटील यांनी केले आहे. खानापूर येथील शिवस्मारक येथे शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांतर्फे मंगळवारी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »