खानापूर : के. एल. ई. तांत्रिक महाविद्यालय बेळगाव आणि प्रा. शंकर आप्पाणा गावडा, सौ. प्रिती परशराम गोरल, ग्रा. पं. सदस्य माणिकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महालक्ष्मी ग्रुपचे प्रमुख श्री. विठ्ठलराव सोमाना हलगेकर, प्रमुख अतिथी म्हणून म. ए. समितीचे नेते …
Read More »वॉटरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
खानापूर : बिजगर्णी (माचीगड) ग्राम पंचायतचे वॉटरमन रामचंद्र राजाराम शिंदे (वय 42) यांना विजेचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना 29 काल दुपारी बिजगर्णी (माचीगड) येथे घडली. रामचंद्र हे गेल्या 8 वर्षांपासून पंचायतीमध्ये कार्यरत होते. नेहमी प्रमाणे काल सोमवार दि. 29 रोजी स. 11 च्या सुमारास पंपसेट सुरू करत …
Read More »खानापूरात गणेशोत्सव निमित्ताने पोलिस पथसंचलन
खानापूर (प्रतिनिधी) : येत्या बुधवारी दि. ३१ रोजी होणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधुन शहरासह तालुक्यातील गावोगावी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. २९ रोजी खानापूर शहरात पोलिस खात्याच्या वतीने पथसंचलन काढून जनतेला शांततेत व उत्साहात गणेशोत्सव ११ दिवस साजरा करण्याचे आवाहन …
Read More »खानापूर आम आदमीकडून अग्निपथाला विरोध
अध्यक्ष भैरू पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरतीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी खानापूर येथील शिवस्मारकातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, अग्निपथ सैन्य भरतीत बरेच तोटे …
Read More »बरगावच्या इसमाचा अपघातात मृत्यू
खानापूर : पारीश्वाड क्रॉसपासून हाकेच्या अंतरावर पारीश्वाड रस्त्याच्या नाल्यावरील पुलाजवळच्या खड्ड्यामुळे रविवार दि. २८ रोजी बरगावच्या तरूणाचा बळी गेला. अमृत शंकर देसाई (वय ४२) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमृत देसाई हे रविवारी रात्री 7 च्या सुमारास दुचाकीने खानापूरहून आपल्या गावी बरगावला निघाले होते. या दरम्यान खानापूर-पारीश्वाड रस्त्याच्या निट्टुर …
Read More »प्रेरणादायी निळकंठराव सरदेसाई; ज्येष्ठ नेते दिगंबर पाटील यांचे उदगार
खानापूर : तालुक्यातील जनतेला रोजगार आणि विकासाचा दूरदृष्टीकोण ठेवून भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याची स्थापना करणारे माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी व्हावे, हा दृष्टिकोन ठेवत महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला साखर कारखान्याने त्यांचा पुतळा कारखान्याच्या आवारात स्थापन करण्याचे ठरविले आहे. यास खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा पूर्ण …
Read More »मराठा मंडळ करंबळ हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश
खानापूर : मराठा मंडळ करंबळ हायस्कूल करंबळ येथील खेळाडूनी मराठा मंडळ खानापूर येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत खालीलप्रमाणे यश संपादन केले. मुलींचा खो-खो – प्रथम, मुलींची – कब्बडी द्वितीय, तसेच योगा कुमारी प्राची पाटील प्रथम कुमार रोहीत सुतार प्रथम, स्किपींग कुमारी नकुशा पाटील प्रथम, कुमार यकाप्पा पाटील प्रथम, …
Read More »हलकर्णी ग्रा. पं. अध्यक्षपदी प्रवीण अगणोजी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरापासून जवळ असलेल्या हलकर्णी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी प्रवीण मारूती अगणोजी तर उपाध्यक्ष पदी रेणूका मल्लापा कुंभार यांची निवड करण्यात आली. हलकर्णी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी प्रवीण मारूती अगणोजी व हरीश शीलावंत याच्यात लढत होती. यावेळी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामुळे प्रवीण अगणोजी यांना सात …
Read More »खानापूरच्या आठवडी बकऱ्यांच्या बाजारात लाखोंची उलाढाल
खानापूर : गणेश चतुर्थी सणाच्या दुसऱ्याच दिवशीच म्हणजे गुरूवारी ऋषी पंचमी (उंदरी) असल्याने खानापूरात आठवड्याच्या बकरी बाजारात बकऱ्यांच्या खरेदी विक्रीत लाखो रूपयाची उलाढाल झाल्याचे दिसून आले. गुरूवारी खानापूर तालुक्यात मोठ्याप्रमाणात उंदरीचा सण साजरा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी बकरी खरेदीसाठी तालुक्याच्या अनेक खेड्यातून नागरिकांनी बेळगाव-पणजी रोडवरील खानापूरच्या वेशीतील हलकर्णी गावाजवळ …
Read More »उघड्यावर टांगण्यात आलेले ते अर्भक प्रेमी युगलांचे?
खानापूर : नेरसाजवळील गावळीवाडा अंगणवाडीच्या बाहेर झाडाला प्लास्टिक पिशवीत लटकवून नवजात अर्भकाला ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. आत्ता ते अर्भक अल्पवयीन जोडीदारांच्या प्रेम संबंधातून झाल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेबद्दल गेल्या दोन तीन दिवसांपासून वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते, त्या अर्भकाला अल्पवयीन मुलीने जन्म दिल्याचे समोर येताच या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta