खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री पांडुरंग सप्ताहाला सोमवारी दि. २८ पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. तर हभप पुंडलिक पांचगे यांच्याअध्यष्ठानाखाली ज्ञानेश्वरी ९ वा व १२ वा अध्ययाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. त्यानंतर ईदलहोंड, अंकले, निट्टूर, गणेबैल, काटगाळी, खेमेवाडी, निडगल, गर्लगुंजी …
Read More »खानापूर तालुक्यातील दहावीच्या प्रथम भाषा पेपरला ३१ विद्यार्थी गैरहजर
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात दहावीच्या बोर्ड परीक्षेला सोमवारी दि २८ पासुन प्रारंभ झाला. खानापूर तालुक्यात दहावी परीक्षेच्या प्रथम भाषा पेपरला संपूर्ण तालुक्यातून ३१ विद्यार्थी गैरहजर होते. तर तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला एकूण ३६६९ विद्यार्थी होते. त्यापैकी ३६३८ विद्यार्थी हजर राहून दहावीची प्रथम भाषा परीक्षा दिली. खानापूर शहरासह तालुक्या एकूण १५ …
Read More »खेलो इंडियासाठी ज्यु. रोहिणी पाटीलची निवड
खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजीची गावची कन्या रोहिणी पाटील आगामी काळात होणाऱ्या बेंगलोर येथे खेलो इंडिया साठी ज्युडो या स्पर्धेत भाग घेणार आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश कानपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालय स्पर्धेत बेळगावच्या रोहिणी पाटील हिने उत्तम रीतीने प्रतिस्पर्ध्याची मात करत चार सामन्यात उत्तम कामगिरी करत आपले वर्चस्व टिकवून ठेवले …
Read More »हरसनवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका जे. ए. मुरगोड शिक्षण सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
खानापूर (प्रतिनिधी) : हरसनवाडी (ता.खानापूर) येथील लोअर प्रायमरी प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जे. ए. मुरगोड यांचा चिकोडी येथे शिक्षण सेवा रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रविवार दि. २६ रोजी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्य मर्यादित अंतरराज्य पुरस्काराचे वितरण रंगदिनाचे औचित्य साधुन चिकोडी येथे करण्यात आला. यावेळी पुरस्काराचे वितरण माजी …
Read More »अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन अध्यक्षपदी बागवान तर उपाध्यक्षपदी इरफान तालिकोटी
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड ता. खानापूर येथे अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूर यांची मासिक बैठक शनिवार दि. 26 रोजी पार पडली. यावेळी बैठकीला एकूण 21 सदस्यांपैकी 17 सदस्य बैठकीला हजर होते. या अगोदर अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूरची स्थापना होऊन दीड वर्ष झाले होते. तसेच …
Read More »मराठा समाजाचा खानापुरात वधू-वर मेळावा
खानापूर : मोठ्या संख्येने मराठा समाज असलेल्या खानापूर तालुक्यात वधू-वर सूचक मंडळाची गरज होती ती आज पूर्ण झाली आहे, असे मनोगत बेळगाव येथील मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर येथील बुरूड गल्लीतील सातेरी पाटील यांच्या एस. माऊली इमारतीत सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन श्री.पाटील यांच्या …
Read More »सैन्यात भरती झालेल्या सिंगीनकोप शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
खानापूर (प्रतिनिधी) : सैन्यात भरती होऊन देशाचे संरक्षण करून आलेल्या सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी सिध्देश्वर केप्पना मादीहाळ हा भारतीय सैन्यातील आयटीबीपीमध्ये भरती होऊन देशाच्या बाॅर्डवर सेवा बजावून प्रथमच आपल्या सिंगीनकोप गावी शनिवारी आला. त्यानिमित्ताने सिंगीनकोप पूर्व प्राथमिक मराठी शाळेत भारतीय सैनिकाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात …
Read More »खानापूर कृषी खात्याच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : जिल्हा कृषी खाते आणि खानापूर तालुका कृषी खात्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला मार्गदर्शन व सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी तज्ञ डॉ. एस. एस. हिरेमठ, डॉ. आर. बी. सुतगुंडी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. …
Read More »खानापूर ता. पं. कार्यालय कार्यनिर्वाहक अधिकारीविनाच
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचा कार्यभार सांभळणारे तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी पद गेल्या काही महिण्यापासून रिक्तच आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयाबरोबरच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयातील कामकाज तसेच ग्राम पंचायत कार्यालयातील कामकाज ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नागरिकांची गैर सोय होय. खानापूर …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीत एकीची वज्रमुठ!
4 एप्रिलपासून पुनर्रचना प्रक्रिया सुरू खानापूर : खानापूर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकी घडली. गुरुवारी झालेल्या दोन्ही गटांच्या संयुक्त बैठकीत एकी करण्याचा निर्णय झाला असून 4 एप्रिल रोजी खानापूर शिवस्मारकात बैठक होणार असून त्या बैठकीपासून पुनर्रचनेला सुरुवात होणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta