खानापूर (प्रतिनिधी) : गणेबैल (ता. खानापूर) येथील श्री चांगळेश्वर शिक्षण संस्थेच्या गणेबैल हायस्कूलमध्ये सेवा समिती बेळगांव यांच्यावतीने आयोजित कोविड-१९ वायरस या विषयावर आधारीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकताच करण्यात आले. या स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. कोविड-१९ वायरस यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या चित्राची मांडणी केली. यावेळी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. …
Read More »खानापूर शहरासह तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शासकीय कार्यालयाच्यावतीने तहसीलदार प्रवीन जैन यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले. तर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने माजी आमदार व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष …
Read More »खानापूर तालुका विकास आघाडीची स्थापना
खानापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन खानापूर तालुका विकास आघाडी स्थापना निमित्ताने पत्रकार परिषद खानापूर शहरातील शिवस्मारक येथील सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष भरमाणी कल्लापा पाटील होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर तालुक्यात परकीयांचे आक्रमण होऊन राजकरण दुषीत झाले आहे. तालुक्यातील सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार …
Read More »असोगा रेल्वे गेट बंदच, प्रवाशांचे हाल
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव- लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण काम युध्दपातळीवर सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील असोगा रेल्वे गेटचे काम गेल्या शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून असोगा रेल्वेगेट बंदच त्यामुळे असोगा परिसरातील मन्सापूर, बाचोळी, कुन्टीनोनगर, त्याचबरोबर मणतुर्गा, नेरसा भागातील नागरिकांचे तसेच दुचाकी वाहनधारकांचे व ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनधारकांना …
Read More »बैलूर प्राथ. कृषी पत्तीन सोसायटीच्या नुतन इमारत, गोडाऊनचा काॅलम भरणी कार्यक्रम संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर गावच्या प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या नुतन इमारत व गोडाऊनचा काॅलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. या इमारतीसाठी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ३० लाखाचा निधी मंजुर कामाचा शुभारंभ केला. यावेळी माजी आमदार व डीसीसी …
Read More »खानापूर तालुक्यात २२०६० पोलिओ डोसचे उद्दिष्ट
खानापूर (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे आरोग्य खात्याच्यावतीने यंदाही ० ते ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस रविवार दि. २७ रोजी देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामिण भागात तीन दिवस पोलिओ डोस तर शहरात चार दिवस पोलिओ डोस देण्यात येणार आहे. पोलिओ डोसचा शुभारंभ रविवारी दि. २७ रोजी सकाळी आठ वाजता होईल. यावेळी कार्यक्रमाला …
Read More »उन्हाळा सुरू खानापूरात शहाळ्याना वाढती मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात मुसळधार पाऊस, हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशी खानापूर तालुक्याची ख्याती आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याची प्रसिद्धी सर्वाहुन वेगळी आहे. नुकताच थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाचे चटके खानापूर शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे आता खानापूर शहरात शहाळे …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या स्थायी कमिटीची बैठक गुरुवारी दि. १७ रोजी नगरपंचायतींच्या सभागृहात पार पाडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. तर बैठकीत नगराध्यक्ष मजहर खानापूरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, तसेच चीफ ऑफिसर बाबासाहेब माने होते. यावेळी प्रेमानंद नाईक प्रास्ताविक केले. तर चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी …
Read More »खानापूर शहराचा विस्तार वाढला तसा कचराही वाढला!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचा विस्तार गेल्या दहा वर्षात झपाट्याने वाढला. लोकवस्ती वाढली. शहराच्या कार्यक्षेत्रात उपनगरे वाढली. त्यामुळे खानापूर शहरात कचरा, पाणी, पथदिप अशा अनेक समस्या खानापूर शहरातील नागरिकांना सतावत आहेत. खानापूर शहरातील मुख्यत्वे करुन कचरा प्रश्न मोठा गंभीर आहे. याला जबाबदार मुख्य खानापूर शहरवासीच आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे …
Read More »खानापूर शहरातील पॅचवर्क म्हणजे निकृष्ट दर्जाचा नमुना
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी समस्येच्या चर्चेत असते. कधी गटारीची समस्या, तर कधी पथदिपाची समस्या, कधी पाण्याची समस्या अशा अनेक समस्या खानापूर शहरासह येथील रहिवाशांना सतावत आहेत. नुकताच खानापूर शहरातील पणजी-बेळगांव महामार्गावरील रस्त्याचे पॅचवर्क करण्यास प्रारंभ केला आहे. खानापूर शहरातील फिश मार्केटपासून ते हलकर्णी गावच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta