Monday , December 8 2025
Breaking News

निपाणी

‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात निपाणीत सार्वजनिक गणेशांचे विसर्जन

  निपाणी (वार्ता) : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही क्षमा असावी, अशी प्रार्थना करत सार्वजनिक गणेश मंडळासह गणेशभक्तांनी शनिवारी (ता. ६) गणरायांना पारंपारिक वाद्यांच्या गजरात “पुढच्या वर्षी लवकर या”च्या घोषणात निरोप दिला. दहा दिवसांच्या कालावधीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. विसर्जनाच्या दिवशी जल्लोष शिगेला पोहचला असला …

Read More »

श्री मराठा संस्थेचा वर्धापन दिन : वर्षभरातच ५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा; अध्यक्ष प्रशांत नाईक

  निपाणी (वार्ता) : सामान्य कुटुंबातील नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मराठा सौहार्द संस्थेने वर्षभरातच ५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा गाठला आहे. संस्था आणि संचालकावर सर्वसामान्य ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. ही संस्था नागरिकासाठी असून पुढील काळात शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट, युवकांना आर्थिक बळ देत स्वावलंबी घडविणे …

Read More »

समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण

  आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत विविध उपक्रमांनी शिक्षक दिन निपाणी (प्रतिनिधी) : पहिली गुरु आई असली तरी खऱ्या अर्थाने मुलांना घडविणारे शिक्षकच असतात. आज अनेक जण विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत, त्यामागे शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गुरुजनांचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. …

Read More »

म्युनिसिपल हायस्कूल पटांगणावरील वाहन पार्किंगमुळे नागरिकांमधून संताप

  निपाणी : निपाणी शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर काही दिवसांपासून अवजड वाहनांचे पार्किंग सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या मैदानावर चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असून क्रीडाप्रेमी युवकांसह परिसरातील शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. नगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या या शाळेत कन्नड, उर्दू, मराठी यांसोबत इंग्रजी माध्यमाची …

Read More »

निपाणीतील अनेक कुटुंबीयांकडून घरातच पाण्यामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन

  निपाणी : निपाणी शहरातील अनेक कुटुंबीयांनी यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती गणेशाचे विसर्जन करून समाजासमोर आदर्श ठेवला. काहींनी मूर्ती दान केल्या, तर काहींनी घरातीलच पाण्याच्या पिंपामध्ये विसर्जन करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. येथील सटवाई रोडवरील प्रल्हाद बाडकर परिवाराने सलग १२व्या वर्षी घरगुती पद्धतीने पाण्याच्या बॅरलमध्ये गणपती विसर्जन करून पर्यावरणपूरक उपक्रम …

Read More »

निपाणीत ४ ठिकाणी गणेशमूर्तीसह निर्माल्याचे संकलन

  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचा पुढाकार ; स्वच्छतेसह विजेची सोय निपाणी : शहर आणि उपनगरात गणेशमूर्ती आणि गौरीचे विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेसह दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि विविध संघटनांच्या पुढाकारातून ४ ठिकाणी गणेशमूर्ती, गौरीचे विसर्जन व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. रामनगर, मराठा मंडळाजवळील हवेली तलाव आणि अंमलझरी रोडवरील तलाव …

Read More »

‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात घरगुती गणेश विसर्जन

  तलाव, विहिरीवर भाविकांची गर्दी; पर्यावरणपूरक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (प्रतिनिधी) : “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या ऽऽ” अशा जयघोषात मंगळवारी (ता.२) निपाणी शहर व परिसरातील घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन उत्साहात पार पडले. सहा दिवसांच्या पूजाअर्चेनंतर भाविकांनी श्रीगणरायाला निरोप दिला. यंदा निपाणी नगरपालिका प्रशासनासह दौलतनगर येथील दौलतराव पाटील …

Read More »

घरोघरी गंगा-गौरीची आकर्षक आरास

भाजी भाकरीसह पुरणपोळीचा : मंगळवारी होणार गंगा गौरीचे विसर्जन निपाणी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या उत्साहात गंगा-गौरीच्या आगमनाने धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच उजळले आहे. गणेशाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचे स्वागत करण्यात आले. परंपरेनुसार पहिल्या दिवशी वांगी, भेंडी, दोडका, दिंडका, गवार, शेपू अशा भाज्यांचा भाजी-भाकरीसह नैवेद्य दाखविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१) …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका व युवा समिती निपाणी यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका व युवा समिती निपाणी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमांतर्गत निपाणी परिसरातील उच्च प्राथमिक मराठी शाळा इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये मराठी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वाळकी, अंमलझरी, पटनकोडी, यमगरणी, बुदीहाल, कोडनी, गायकवाडी या शाळेमध्ये वाटप केले. …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीच्या ध्येयधोरणानुसार निपाणी तालुका युवा समिती कार्य करणार!

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका आणि युवा समिती निपाणी तालुका यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यामध्ये तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस हिंदुराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मत्तीवडे येथे बैठक पार पडली. सीमाभागात चालू असलेली कन्नडसक्ती, केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने सीमा भागातील मराठी भाषिक जनतेला त्यांच्या भाषेतून मराठी …

Read More »