Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वर

संकेश्वरात माघी गणेश जयंती भक्तीमय वातावरणात साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) :  संकेश्वर परिसरातील सर्वच श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. मठ गल्ली गजानन मंदिर सांस्कृतिक भवन येथे श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली. श्री गणेश जयंती निमित्त येथे पुरोहित नरेंद्र उपाध्ये यांनी पूजा अभिषेक करुन महाआरती सादर केली. त्यांनी सकल भक्तगणांना सुख शांती …

Read More »

संकेश्वर अंकले रस्ता शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम

  संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील अंकले रस्ता कन्नड उच्च प्राथमिक शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. शाळा सुधारणा समिती, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय मुलींनी आपल्या आईची पाद्यपूजा करुन आर्शीवाद घेतला. सभेत शिक्षिकांनी उपस्थित मातांची ओटी भरुन हळदीकुंकू कार्यक्रम पार पाडला. सभेत सीआरपी एम. …

Read More »

संकेश्वर कमतनूर वेसीत तोबा गर्दी…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजार दिवशी कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि बाजार पेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं माजी खासदार रमेश कत्ती यांनी राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये भाजी बाजार भरविणेचा घेतलेला निर्णय अगदी योग्य असल्याची चर्चा आज बाजारात लोकांतून होताना दिसली. …

Read More »

माजी खासदार रमेश कत्ती भजनात तल्लीन….

संकेश्वर (प्रतिनिधी) : भजन, किर्तनातून मनाला मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही. बेल्लद बागेवाडी येथील जडीयसिध्देश्वर देवालयात चाललेल्या भजन कार्यक्रमात माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती सहभागी होऊन भजनात चांगलेच तल्लीन होऊन गेलेले दिसले‌. देवालयात कोणी मोठा आणि कोणी छोटा नसतो. तेथे सर्व भक्तगण …

Read More »

कुंकू सौभाग्याचे लेणे : सुभाष कासारकर

संकेश्वर (प्रतिनिधी) : कुंकू सौभाग्याचे लेणे आहे. ते कपाळावर लावण्यात लाज कसली? सौभाग्यावती महिलांना फॅशनेबल टिकली पेक्षा कुंकूच शोभून दिसते, असे श्रीरामसेनेचे हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर यांनी सांगितले. ते गायकवाड मळा भागातील श्री रेणुका देवी मंदिरात आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा …

Read More »

भारतीय संस्कृती रुजली पाहिजे : मिनाक्षी ए. पाटील

संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन-अडीच वर्षांत सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प झाले होते. आता परत कार्यक्रम होताना दिसत आहेत. आजच्या पिढीतील मुलींना सांस्कृतिक कार्यक्रमाची ओळख करुन देण्यासाठी ‘उत्तरायण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सौ. मिनाक्षी ए. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या, आमच्या एसडीव्हीएस शिक्षण संस्थेतर्फे उत्तरायण …

Read More »

संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला आडकाठी आणाल तर आंदोलन छेडणार : प्रमोद मुतालिक

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाला आडकाठी आणाल तर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांनी दिला आहे. त्यांनी संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाला धावती भेट देऊन देवदर्शन घेऊन श्री शंकराचार्य महास्वामीजींचा आर्शीवाद घेतला. तद्नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रमोदजी मुतालिक म्हणाले केंद्रात आणि राज्यात भाजपाचे …

Read More »

संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेला कोरोना नियम बंधनकारक

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात आज सायंकाळी मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यान्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात सभा घेऊन श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा शासकीय कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत परंपरागत पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला उपतहसीलदार के. के. बेळवी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक …

Read More »

संकेश्वरात कन्येच्या वाढदिवसाला पित्याने केले नेत्रदान

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील एका पित्याने आपल्या कन्येचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने नेत्रदान करुन साजरा केला आहे. येथील रितीका मिल्क सेंटरचे मालक व संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनचे सदस्य प्रभाकर जी पाटील यांनी आपली कन्या कुमारी रितीका हिचा सहावा वाढदिवस बेळगांव केएलई नेत्रपेढीला नेत्रदान करुन कुटुंबासमवेत साजरा केला आहे. त्यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसाला …

Read More »

मुख्यमंत्रीपद नकोरे बाबा…….!

संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्याचा मीच मुख्यमंत्री होणार असे वारंवार सांगणारे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं आजमात्र मुख्यमंत्रीपद नकोरे बाबा असे सांगितले. हिरण्यकेशी कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना मंत्री उमेश कत्तीं यांची ट्यून बदललेली दिसली. यापूर्वी त्यांनी अनेकवेळा आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले आहे. अखंड कर्नाटकचा ना …

Read More »