Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरात शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील शासकीय कार्यालयात आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती भक्तीमय व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वर पालिकेत नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. यावेळी नगरसेवक अमर नलवडे, डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, सचिन भोपळे, प्रशांत कोळी, जयप्रकाश सावंत, राजू जाधव, मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद पालिका कर्मचारी उपस्थित होते. येथील रंगाची चावडी तलाठी कार्यालयात तलाठी गणप्पा लमानी यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. यावेळी रशीद नन्नुभाई, सुभाष सनदी, संकेश्वर मराठा समाजाचे अध्यक्ष अप्पा मोरे, पुष्पराज माने, शेखर सुर्यवंशी उपस्थित होते.

शिवाजी चौकात शिवजयंती

येथील शिवाजी चौकात छ्त्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथे शिवरायांच्या प्रतिमेला माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी पुष्पहार घालून मानाचा मुजरा केला. यावेळी नगरसेवक ॲड. प्रमोद होसमनी, माजी नगरसेवक दिपक भिसे, किर्तीकुमार संघवी, मराठा समाजाचे अध्यक्ष अप्पा मोरे, उपाध्यक्ष सुभाष कासारकर, शाम यादव, समीर पाटील, अमोल गोंधळी, सचिन सपाटे, संदिप अटक, योगशिक्षक बसवराज नागराळे, कांत बेविनकट्टी, अप्पा शिंत्रे, जयप्रकाश खाडे, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *