निपाणी (वार्ता) : निपाणी-चिक्कोडी रोडवरील जत्राटवेस मधील महात्मा बसवेश्वर सर्कलमध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे हा सर्कल शेकडो देव्यांनी उजळून गेला होता. येथील समाधी मठातील प्राणलिंग स्वामी आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रारंभी स्वामी व …
Read More »शेतकर्यांच्या आंदोलनाला गालबोट; तीसहून अधिक ट्रॅक्टर, 100 ट्रॉली, दुचाकी जळून खाक
जमखंडी : उसाला महाराष्ट्राप्रमाणे दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मुधोळ तालुक्यात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला आज गालबोट लागलेे. संतप्त शेतकर्यांनी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली यात तीसहून अधिक ट्रॅक्टर व 100 ट्रॉली, दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. यावेळी तुफान दगडफेक झाल्याने अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुखांसह अनेक पोलिस …
Read More »जगाच्या नकाशावरून आतंकवाद्याचे नामो निशाण मिटवून टाका : प.पू प्राणलिंग स्वामीजी
दिल्ली येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध निपाणी : पाकिस्तान हा निर्माण झाल्यापासून आपल्या देशावर सतत आतंकवाद्यांच्या माध्यामापासून कुरघोडी करत आहे. या आतंकवाद्याचे हृदय परिवर्तन कधीच होणार नाही. या आतंकवादीची पाळ मूळ जगाच्या नकाशावरून पुसून टाकावेच लागेल, तरच देशातील नागरिक सुरक्षित राहू शकतील. आजच्या तरुणांनी केवळ सामाजिक माध्यमांद्वारे पोस्ट …
Read More »हलसाल येथे हत्तींकडून भात पिकाचे नुकसान
खानापूर : खानापूर तालुक्यातील हलसाल येथे हत्तींच्या कळपाने भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. मागील दोन दिवसांपासून आठ ते दहा हत्तींचा कळप हलसाल येथील जमिनीत थैमान घालत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तात्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खानापूर …
Read More »अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूह बोरगांवचे कार्याध्यक्ष, युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांचा ५० वा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अरिहंत सहकारी जवळी गिरणी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याला बोरगाव सह परिसरातील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेवक अभय कुमार मगदूम …
Read More »बेनाडीत १७ पासून ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; शर्यतीसह कुस्तीची मेजवानी निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील ग्रामदैवत श्रीकाडसिद्धेश्वर यात्रेला सोमवार( ता. १७) पासून प्रारंभ होणार आहे. बुधवार (ता. १९) अखेर चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय शर्यती आणि कुस्तीची मेजवानी ही मिळणार आहे. सोमवारी (ता. १७) सिद्धेश्वर देवास रुद्राभिषेक, …
Read More »बोरगाव हजरत बावा ढंगवली उरुसातील शर्यतीत ऋषिकेश मनगुत्ते यांची बैलगाडी प्रथम
अब्दुल लाटची बैलगाडी द्वितीय ; शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावाढंगवली आणि हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या ऊरूसा निमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीसाठी बोरगावच्या ऋषिकेश मनगुते, अब्दुल लाटच्या सचिन खोत आणि शिरढोणच्या अशिफ मुल्ला यांच्या बैलगाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना …
Read More »निपाणी नगरपालिकेच्या फलकावरील नावात असंख्य चुका
नगरसेवकांचा आक्षेप ; नागरिकांच्याही संतप्त प्रतिक्रिया निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत ३१ ऑक्टोबर संपुष्टात आली. त्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आयुक्तांनी शहराचा कारभार हाती घेतला. तरीही सभागृह म्हणून पदाधिकारी व नगरसेवक कार्यरत आहेत. असे असताना सभागृह संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यालयात असलेले नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक काढण्यात आले होते. …
Read More »हलसाल परिसरात हत्तींच्या कळपाचे थैमान!
भातपिकांचे नुकसान! नुकसानभरपाई व हत्ती बंदोबस्ताची मागणी खानापूर : खानापूर तालुक्यातील हलसाल या गावात गेल्या दोन दिवसांपासून आठ हत्तींचा कळप थैमान घालत असून, गावातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तत्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची …
Read More »माचीगड गावात अस्वलाचा संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
खानापूर : खानापूर तालुक्यातील हलशीजवळील माचीगड गावात आज सोमवारी, पहाटे सुमारे 4.30 वाजता अस्वल गावातून मुक्त संचार करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे गावातील काही महिला व मुले प्रातर्विधीसाठी घरातून बाहेर पडत असताना, त्यांनी अस्वलाला गल्लीतून पळत जाताना पाहिले. अचानक समोर रानटी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta