Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा निर्णय!

  बेंगळुरू : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात आलेली पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा राहुल एम. खरगे यांनी घेतला आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (मुडा) घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान राहुल यांनी हे पाऊल उचलले आहे. ही पाच एकर …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खानापूरात शानदार पथसंचलन!

खानापूर : खानापूर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे विजयादशमीचे औचित्य साधून खानापूर शहरात पथसंचलन व सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आले होते. येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावरून सुरू झालेले पथसंचलन खानापूर स्टेशन रोड शिवस्मारक चौक बसवेश्वर चौक यांचा केंचापुर …

Read More »

निपाणीत उरुसाला प्रारंभ

  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दर्गाह येथील महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब (क-स्व.) यांच्या उरूसाला चुनालेपनाने प्रारंभ झाला आहे. सोमवार (ता.१४) ते बुधवार (ता.१६) अखेर मुख्य कार्यक्रम होणार आहेत. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती, कुस्ती मैदानाचे आयोजन …

Read More »

निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी

  आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार राजवाड्यामध्ये ऐतिहासिक व पारंपारिक पद्धतीने दसरोत्सव पार पडला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी अमराईतील रेणुका मंदिराजवळ सोने लुटून दसरा साजरा करण्यात आला. शनिवारी (ता.१२) सकाळी तुळजाभवानीला अभिषेक घालून घट हलविण्यात …

Read More »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी शाळांना संजीवनी मिळावी

  निपाणी (वार्ता) : मराठी भाषेची निर्मिती ही शके ९०५ मध्ये लिहिलेल्या गोमटेश्वराच्या शिलालेखाद्वारे स्पष्ट होते. सुमारे अडीच हजार वर्षे प्राचीन व समृद्ध वारसा लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ही घटना मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद आहे. आता राज्यासह सीमा भागातील बंद पडलेल्या मराठी माध्यमाच्या शाळांना संजीवनी मिळावी अशा आशयाचे …

Read More »

विश्वविख्यात म्हैसूर दसरा महोत्सवाची आज जंबो सवारीने सांगता

  बंगळूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाच्या नेत्रदीपक जंबोसावरी मिरवणुकीला आज (१२ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. ऐतिहासिक विजयादशमीच्या मुहूर्तावर काढण्यात येणारी जंबो सवारीच्या मिरवणुकीचा शुभारंभ म्हैसूर पॅलेसच्या आवारात सुवर्ण अंबरीत सर्वांलंकार परिधान करून विराजमान झालेल्या श्रीचामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात येईल. शनिवारी दुपारी ४ ते ४-३० दरम्यान मुख्यमंत्री …

Read More »

आयटी कंपन्यानाही लाल-पिवळा फडकावण्याची सक्ती

  बंगळूर : यावर्षी १ नोव्हेंबर रोजी ५० वा कन्नड राज्योत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सर्व शाळा, महाविद्यालये, कारखाने आणि आयटीबीटी कार्यालयांमध्ये लाल-पिवळा (कन्नड) ध्वज अनिवार्यपणे फडकवण्याचे आदेश दिले आहेत. बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एक नोव्हेंबर हा कर्नाटकसाठी महत्त्वाचा आहे. …

Read More »

यमगर्णीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून

  सौरभच्या फसवणुकीचा राग; हिंडलगा कारागृहात रवानगी निपाणी(वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीमधील सहारा हॉटेल जवळ एका सामाजिक कार्यकर्त्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. गुरुवारी (ता.१०) रात्री दहा वाजण्याचा सुमारास ही घटना घडली आहे. संतोष विश्वनाथ चव्हाण (वय ४० रा. यमगर्णी) असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. …

Read More »

रेणुकास्वामी हत्या प्रकरण : दर्शनच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; १४ ला निकाल

  बंगळूर : चित्रदुर्गातील रेणुकास्वामी खून प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता दर्शनच्या जामीन अर्जावर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पूर्ण केली आणि १४ ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला. ५७ व्या सीसी न्यायालयाने दर्शनने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी केली आणि आरोपीचे वकील सी. व्ही. नागेश आणि एसपीपी प्रसन्न कुमार यांचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय …

Read More »

कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

मंत्रिमंडळाचा निर्णय; भाजप सरकारच्या काळातील गैरव्यवहार बंगळूर : भाजप सरकारच्या काळात झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. गुरुवारी विधानसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले …

Read More »