Thursday , September 19 2024
Breaking News

कर्नाटक

खानापूर जंगलवासीयांनी मान्य केल्यास त्यांचे अन्यत्र स्थलांतर करू : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  खानापूर : खानापूर वनभागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी सहमती दर्शवल्यास त्यांना इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्र्यांशी आधीच बोलले आहेत. शेकडो वर्षांपासून तेथे लोक राहतात, वनविभागाच्या कायद्यानुसार गावकऱ्यांनी सहमती दर्शवली तर ते कुटुंबाला 15 …

Read More »

खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केली पाहणी

  खानापूर : माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तसेच खानापूर तहसीलदार यांनी आज खानापूर तालुक्यात पावसामुळे पडलेल्या घरांचा पहाणी दौरा केला. खानापूर तालुक्यात पावसामुळे एकूण 201 घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी 39 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असल्याचे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस सरकार हे …

Read More »

कारवार-गोवा संपर्क पूल कोसळला; लॉरी नदीत

  कारवार : कारवार-गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कोडीबाग पूल कोसळला आहे. काळी नदीवर ४३ वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला आणि एक लॉरी नदीत पडली. पोलिसांनी ट्रकचालकाची सुटका केली. मात्र याआधी कोणती वाहने पुलावरून नदीत कोसळली आहेत काय हे समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी …

Read More »

निपाणीत ‘शिवशंभोचा’ गजर

  पहिला श्रावण सोमवार; दर्शनासाठी भाविकांच्या रांगा निपाणी (वार्ता) : यंदा बऱ्याच वर्षानंतर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार आला त्यामुळे निपाणी शहरासह परिसरातील शिव मंदिरे सोमवारी (ता.५) भाविकांनी फुलून गेली होती. शिवाय दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमासह ‘हर हर महादेवाचा गजर सुरू होता. अनेक ठिकाणी दर्शनासाठी रांगा केल्याने भाविकांची चांगली सोय झाली. …

Read More »

काँग्रेस सरकारच्या पतनाची वेळ जवळ; एच. डी. कुमारस्वामी यांचे भाकीत

  भाजप-धजदच्या पदयात्रेचा तिसरा दिवस बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकार कोसळण्याची वेळ जवळ आली आहे, असे भाकीत धजदचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमास्वामी यांनी केले. केंगल अंजनेयस्वामी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर भाजप-धजदने सुरू केलेल्या म्हैसूर चलो पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी ते बोलत होते. राज्य काँग्रेसचे सरकार पापांनी भरले असून त्याच्या …

Read More »

१४ तास काम करण्यास आयटी कर्मचाऱ्यांचा विरोध

  सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने बंगळूर : राज्य आयटी/आयटीईएस कर्मचारी संघटनेने कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स कायद्यात सुधारणा करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आणि दिवसाचे १४ तास काम करणार नाही, असे स्पष्ट केले. आयटी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्यासाठी कमर्शिअल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, १९६१ मध्ये सुधारणा करण्याची राज्य सरकारची योजना आहे, …

Read More »

अतिवृष्टीमुळे खानापूर, बेळगाव ग्रामीण व कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर

  खानापूर : बेळगाव जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे, बेळगाव ग्रामीण, खानापूर तालुका आणि कित्तूर तालुक्यांतील अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, यांनी एका आदेशान्वये दिली आहे. खानापूर तालुका, बेळगाव ग्रामीण आणि कित्तूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे बालकांना अंगणवाड्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यासाठी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, मंगळवार …

Read More »

गावे स्थलांतरीत करण्याच्या निर्णयासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी

  खानापूर : कस्तुरीरंगन अहवालानुसार केंद्र सरकारने खानापूर तालुक्यातील 61 गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून केंद्र सरकार सदर गावे स्थलांतरीत करण्याचा विचार करीत आहे. तसा मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यावर 60 दिवसात सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने …

Read More »

मराठा मंडळ कॉलेजजवळ असलेल्या दुभाजकाला दुचाकीची धडक; युवकाचा मृत्यू

  खानापूर : मराठा मंडळ पदवी कॉलेजजवळ असलेल्या खानापूर-बेळगाव महामार्गावरील पुलाखाली असलेल्या संपर्क रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुभाजकला दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी गावातील निखिल नागेंद्र उर्फ नागो गुंजीकर (वय 22) हा दुचाकीस्वार युवक बेळगावहून खानापूरकडे येत असताना रात्री …

Read More »

येत्या ७२ तासांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

  बंगळुरू : यंदा पावसाने भीषण पूरस्थिती निर्माण केली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हवामान खात्याने पुढील ७२ तास ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाळा संपायला अजून २ महिने बाकी आहेत. म्हणजेच सप्टेंबर २०२४ पर्यंत मान्सून पाऊस पडेल. असे असले तरी अवघ्या २ महिन्यात पावसाच्या …

Read More »