Sunday , July 26 2026
Breaking News

एआयसीसी सचिव अंजली निंबाळकर दिल्लीतील पत्रकार परिषदेत सहभागी

Spread the love

 

खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) च्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सहभाग घेतला.
डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दादरा नगर हवेली येथील निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान आयोजित या पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. अखिल भारतीय काँग्रेस समितीने दमण आणि दीव येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मतदारांना आकर्षित केले जात असल्याबद्दल सविस्तर माहिती देत तेथील नेमक्या वस्तुस्थितीचा खुलासा केला. या वेळी एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सहभागी होऊन याबद्दल माहिती दिली. त्यांनी पत्रकार मित्रांचे स्वागत करून आपल्या कार्यक्षेत्रातील प्रमुख नेत्यांकडून मिळालेली माहिती सादर केली.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *